5000mAh बॅटरीचा Moto E7 Plus स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः मोटोरोलाने भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन केवळ सिंगल व्हेरियंट ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. मिस्टी ब्लू आणि ट्वलाइट ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनचा सेल ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. वाचाः Moto E7 Plusचे वैशिष्ट्ये ड्यूल नॅनो सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस मॅक्स विजन डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 460 SoC प्रोसेसर मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक २ मेगापिक्सलचा सेकंडरी लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः रियर फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-GPS, मायक्रो यूएसबी पोर्ट, WiFi b/g/n आणि 4G LTE यासारखे ऑप्शन मिळत आहे. वाचाः मोटोरोलाच्या या बजेट स्मार्टफोनमध्ये एक तुम्हाला डेडिकेटेड गुगल असिस्टेंट बटन आणि गुगल लेन्स मिळणार आहे. फेस अनलॉग फीचर देण्यात आले आहे. फोन रिपेलेंट डिझाईन सोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2G1Kum4

Comments

clue frame