हवेत उडणाऱ्या वाहनाचा प्रयोग यशस्वी; पाहा Video

हॉलीवूडचा अभिनेता रॉबिन विलियम्सचा 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'फ्लबर' या चित्रपटात हवेत उडणारी कार दिसली होती. चित्रपटातील ते दृश्य सत्यात अवतरण्याचे संकेत जपानने दिले आहेत. जपानमधील स्कायड्रायव्ह इंकने एका व्यक्तीसह हवेत उडणाऱ्या वाहनाटा प्रयोग यशस्वी करुन दाखवलाय.    

कंपनीने यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील जारी केलाय. या व्हिडिओमध्ये मोटार वाहन पंख्याच्या साहय्याने एक ते दोन मीटर उंच हवेत उडताना दिसते. या कल्पक प्रयोगासंदर्भात स्कायड्राइव कंपनीचे प्रमुख तोमोहिरो फुकुजावा म्हणाले की, 2023 पर्यंत ' हवेत उडणारी कारचे उत्पादन शक्य होईल. या प्रकरच्या वाहनाच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे ही मोठं आव्हान असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. जगभरात हवेत उडणाऱ्या कारची निर्मिती करण्यासंदर्भातील शंभरहून अधिक प्रयोग सुरु आहेत. यातील काही एका व्यक्तीसह हवेत उड्डाण करण्याची क्षमता असणारे मोजके प्रयोग यशस्वी ठरले, आहेत, याकडेही फुकजावा यांनी लक्ष वेधले.  

ट्रम्प यांनी उमेदवारी स्वीकारली

ते पुढे म्हणाले की, अनेक लोक या अनोख्या वाहनाची अनुभूती घेण्यास उत्सुक आहेत. सध्याच्या घडीला या वाहनामध्ये पाच ते दहा मिनिटे हवेत उडण्याची क्षमता आहे. ही क्षमता 30 मिनिटांपर्यंत वाढवणे शक्य आहे. या वाहनाचे चीनसारख्या देशात निर्यातही केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  स्कायड्राइव 2012 पासून या उत्पादनावर काम करत आहे.  जपानमधील प्रमुख वाहन कंपनी टोयोटा मोटर कॉर्प, इलेक्ट्रॉनिक कंपनी पॅनासॉनिक कॉर्प आणि वीडियो गेम कंपनी नॅमकोने यासाठी अर्थिक मदतीचा हातही दिला आहे. तीन वर्षांपूर्वी देखील या वाहनाची चाचणी घेण्यात आली होती. यावेळी कंपनीला अपयश आले होते.  
 



from News Story Feeds https://ift.tt/31CpF8T

Comments

clue frame