मोबाइल बँकिंगमध्ये फ्रॉडची भीती, SBI चा खातेदारांना हा सल्ला

नवी दिल्लीः ऑनलाइन बँकिंग मुळे युजर्संना खूप मोठा फायदा होत आहे. युजर्संना आता बँकांसंबंधीत सर्व माहितीसाठी ब्रांचमध्ये जाण्याची गरज नाही. इंटरनेट आणि स्मार्टफोन्सने आपल्या बँकिंगला खूपच सोपे केले आहे. परंतु, सध्या ऑनलाइनचे फ्रॉड वाढले आहेत. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित म्हटले जावू शकत नाही. युजर्संना अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल बँकिंग दरम्यान काय काळजी घ्यावी यासाठी युजर्संना काही काळजी घेण्याची सूचना केली आहे. काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वाचाः वाचाः फोनच्या IMEI नंबर कुठे तरी नोट करुन ठेवा फिशिंग किंवा फ्रॉड प्रकरणात फोनच्या IMEI नंबरची गरज पडते. त्यामुळे हँडसेटचा IMEI नंबर कुठे तरी लिहून ठेवा. डिव्हाईसच्या IMEI नंबरसाठी सेटिंग अॅप्समध्ये जावू शकता. तसेच फोनवरून *#06# डायल करूनही IMEI नंबर मिळवता येवू शकतो. वेळोवेळी डेटा बॅकअप घ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने युजर्संना फोनमध्ये डेटा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास डेटाला ट्रॅक आणि सिक्योर केले जावू शकते. तसेच एक्स्ट्रा सिक्योरिटी साठी पिन कोड पासकोड किंवा बायोमॅट्रिक पासवर्ड प्रोटेक्ट करा. वाचाः वाचाः डेटा ट्रान्सफर करताना त्याला स्कॅन करा कम्प्यूटर हून मोबाइलवर डेटा ट्रान्सफर करण्याआधी त्याला अँटी व्हायरसने स्कॅन करा. यामुळे मोबाइल करप्ट किंवा व्हायरस फाइलची मोबाइलमध्ये एंटर होणार नाही. स्टेब मोबाइल आणि मोबाइल सेव युजरच्या बँकिंग डिटेल्सची सिक्योरिटी साठी महत्त्वपूर्ण आहे. फोनला अपडेट करा फोनला नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेयरने अपडेट ठेवा. नवीन फीचर्स सोबत मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स मध्ये लेटेस्ट सिक्योरिटी पॅच दिला आहे. हे डिव्हाईसला व्हायरस अटॅकच्या धोक्यापासून वाचवण्यात मदत करते. वाचाः वाचाः पासवर्ड आणि युजरनेम ठेवा सेफ फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी फोनमध्ये कधीही बँकिंग पासवर्ड, युजरनेम किंवा एटीएम पिन ला सेव्ह करू नका. जर असे असेल तर लॉक फीचर जरुर ठेवा. या चुका कधीच करू नका फोन आणि डेटाची सिक्योरिटीसाठी सर्वात आधी फोनला आपल्यापासून दूर ठेवू नका. जर तुम्ही काही अॅपचा वापर करीत नसाल तर त्याला तात्काळ डिलीट करा. तसेच अज्ञात वायफाय नेटवर्क्सचा वापर करु नका. मोबाइलने त्याला कनेक्ट करू नका. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EnsqSq

Comments

clue frame