नवी दिल्लीः शाओमीने गुरुवारी आपला नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे हा फोन १० हजार रुपयांपेक्षा स्वस्त आहे. या फोनचा थेट सामना रियलमीचा लेटेस्ट स्मार्टफोन सोबत होणार आहे. किंमतीशिवाय दोन्ही फोनमधील वैशिष्ये समान आहेत. त्यामुळे अनेकांना समजत नाही की या दोन फोनपैकी कोणता फोन बेस्ट आहे. दोन्ही फोनच्या फीचर्सची तुलना केल्यास तुम्हीच ठरवा कोणता स्मार्टफोन बेस्ट आहे. वाचाः रेडमी ९ स्वस्त रेडमी ९ स्मार्टफोन 4GB+ 64GB मॉडलची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB+ 128GB मॉडलची किंमत ९९९९ रुपये आहे. हा फोन ब्लू, ऑरेंज आणि ब्लॅक या तीन रंगात आहे. तर रियलमी सी १५ च्या 3GB+ 32GB मॉडलची किंमत ९९९९ रुपये आहे. तसेच 4GB+ 64GB मॉडलची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. हा फोन दोन कलरमध्ये पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर कलरमध्ये येतो. रेडमीचा फोन कमी किंमतीत जास्त स्टोरेजमध्ये मिळतो. वाचाः डिस्प्ले आणि डिझाईन दोन्ही स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले मिळतो. जो वॉटरड्रॉप नॉच सोबत येतो. रेडमी ९ मध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तर रियलमी सी १५ मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. मागच्या बाजुला दोन्ही फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. सॉफ्टवेयर आणि प्रोसेसर दोन्ही स्मार्टफोनध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर आणि अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टमसोबत येतो. रेडमी ९ मध्ये ४ जीबी रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज ऑप्शन आहे. तर रियलमी सी १५ मध्ये 3GB/4GB रॅमसोबत 32GB/64GB स्टोरेज ऑप्शन आहे. वाचाः रियलमी सी१५ मध्ये दमदार कॅमेरा रेडमी ९ मध्ये 13MP + 2MP चा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर C15 स्मार्टफोनमध्ये 13MP + 8MP + 2MP + 2MP क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. रेडमी ९ मध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि रियलमी सी १५ मध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियलमीत बॅटरी पॉवरफुल बॅटरीत दोन्ही फोनची तुलना केली तर रियलमीची बॅटरी पॉवरफुल आहे. रेडमी ९ मध्ये 5,000mAh ची बॅटरी 10W चार्जिंग सपोर्ट सोबत येते. तर रियलमी सी १५ मध्ये 6,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सोबत येते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gBhKNz
Comments
Post a Comment