५ कॅमेऱ्याच्या Nokia 5.3 स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल

नवी दिल्लीः नोकिया ५.३ स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. भारतात या स्मार्टफोनला मागच्या आठवड्यात लाँच करण्यात आले होते. ग्राहक या फोनला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट Nokia.com वरून खरेदी करू शकतात. फोनची सुरुवातीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसर, क्वॉड रियर कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः फोनची किंमत फोन दोन व्हेरियंट मध्ये येतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. फोन चारकोल, सियान आणि सँड कलर या ऑप्शनमध्ये येतो. वाचाः वाचाः नोकिया ५.३ स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1600x720 पिक्सल आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, दिला आहे. या फोनमध्ये ४ जीबी प्लस ६ जीबी रॅमचा स्टोरेज मिळतो. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन २२ तासांपर्यंत टॉकटाईम आणि १८ तास स्टँडबाय टाइम देतो. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि गुगल असिस्टेंट साठी डेडिकेटेड बटन दिले आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bfhVNn

Comments

clue frame