नवी दिल्लीः Apple ची लाँचिंग तारीख जवळ येत आहे. या दरम्यान सीरीज संबंधी अफवा आणि माहिती खूप ऐकायला मिळत आहे. ट्रेंडफोर्सच्या या एका नवीन रिपोर्टच्या माहितीनुसार कंपनी आपल्या २०२० लाइनअपला विना अॅक्सेसरीजला लाँच करणार आहे. या सीरीजमधील डिव्हाईस सध्या आयफोन ११ पेक्षा महाग असू शकतात. वाचाः वेगळा खरेदी करावे लागणार २० वॉटचे चार्जर रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅपल आयफोन १२ सीरीजच्या स्मार्टफोन्समध्ये रिटेल बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. तसेच नवीन आयफोन बिना वायर्ड ईयरपॉड्स सोबत येतील. आयफोन १२ सीरीजच्या शिवाय अॅक्सेसरीज येणार असल्याची माहिती याआधीही अनेक रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे. या रिपोर्ट्समध्ये हेही म्हटले की, कंपनी आयफोन १२ सीरीज साठी वेगळा २० वॉटचा चार्जर ऑफर करणार आहे. वाचाः ६९९ डॉलर असू शकते सुरुवातीची किंमत ट्रेंडफोर्सने आपल्या रिपोर्टमध्ये आयफोन १२ सीरीज अंतर्गत येणाऱ्या डिव्हाईसच्या किंमतीचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आयफोन १२ ची किंमत ६९९ डॉलर ते ७४९ डॉलर या दरम्यान असू शकते. आयफोन १२ मॅक्स ला कंपनी ७९९ डॉलर किंवा ८४९ डॉलरच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत लाँच करू शकते. तर आयफोन १२ प्रो ला १०४९ डॉलर ते १०९९ डॉलर या दरम्यानच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करू शकते. आयफोन १२ प्रो मॅक्स ची किंमत ११४९ डॉलर ते ११९९ डॉलर या दरम्यान असू शकते. वाचाः आतापर्यंतची सर्वात महाग आयफोन सीरीज या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आयफोन १२ सीरीज कंपनीची महाग सीरीज असणार आहे. आयफोन १२ सीरीज महाग असू शकतात हे आधीपासूनच बोलले जात आहे. कारण, यात ५ जी कनेक्टिविटी सोबत अनेक खास फीचर पाहायला मिळू शकतात. परंतु, अॅपलकडून सांगण्यात आले आहे की, आयफोन १२ च्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31BaxJ8
Comments
Post a Comment