सॅमसंग Galaxy A21s स्मार्टफोन स्वस्त, २ हजारांची कपात

नवी दिल्लीः सॅमसंगचा स्मार्टफोन स्वस्त करण्यात आला आहे. या फोनच्या किंमतीत २ हजारांची कपात करण्यात आली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः कपातीनंतर फोनची किंमत हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत १५०० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजच्या मॉडलच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. यानंतर या फोनची किंमत १६ हजार ४९९ रुपये झाली आहे. हा स्मार्टफोन तीन कलर, ब्लॅक, व्हाईट आणि ब्लू या रंगात उपलब्ध आहे. नवीन किंमत कंपनीच्या वेबसाईटवर अपडेट केले आहेत. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले ओ दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल्स आहे. फोनमध्ये सॅमसंगचा Exynos 850 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढतवा येवू शकतो. फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली आहे. 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hBH0Vl

Comments

clue frame