BSNL ची जबरदस्त भेट, वर्षभरासाठी मिळतोय फ्रीमध्ये 5GB डेटा

नवी दिल्लीः ने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त भेट आणली आहे. कंपनी आपल्या लँडलाईन युजर्संसाठी एका वर्षासाठी ५ जीबी हायस्पीड डेटा फ्रीमध्ये देत आहे. BSNL गुजरात सर्कलने या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही ऑफर केवळ अशा लँडलाइन युजर्संना मिळणार आहे. जे युजर्स ब्रॉडबँड कनेक्शनचा वापर करीत नाहीत. कंपनीने या ५ जीबी डेटाला ग्राहक BSNL Wifi हॉटस्पॉट सर्विस साठी वापर करू शकतील. वाचाः वाचाः BSNL वायफाय हॉटस्पॉट सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या जवळपास बीएसएनएलचे Wi-Fi हॉटस्पॉट झोन असणे आवश्यक आहे. यावरून एक पेज ओपन होईल. या ठिकाणी तीन पर्याय Public Wifi, BSNL users आणि Landline मिळणार आहे. लँडलाइन ऑफर करणाऱ्या युजर्संना Landline ऑप्शनवर टॅप करावे लागेल. किंवा आपला लँडलाइन नंबर एसटीडी कोडसोबत नोंदवावा लागेल. Get PIN वर क्लिक करावे लागेल. आता तुमचा रजिस्टर्ज मोबाइल नंबर वर एक पिन येईल. तो टाकून लॉगिन करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ५ जी डेटाची फ्रीमध्ये मजा घेता येवू शकेल. वाचाः वाचाः BSNL Wifi हॉटस्पॉट कुठे बीएसएनएल देशभरात ३४ हजार २६० वाय फाय हॉटस्पॉटची सुविधा देत आहे. भारतात २६ हजार ८५६ वेगवेगळ्या लोकेशनवर सुविधा उपलब्ध आहे. ५जीबी डेटा संपल्यानंतर लँडलाइन युजर्संना हॉटस्पॉट प्लान खरेदी करता येवू शकते. एकट्या नॉर्थ इंडियात याचे ९८५५ बीएसएनएल वायफाय हॉटस्पॉट उपलब्ध आहेत. तसेच पूर्वी क्षेत्रात बीएसएनएलचे ५४०३ वाय फाय हॉटस्पॉट आणि पश्चिम सर्कलमध्ये ९४९२ वायफाय हॉटस्पॉट आणि दक्षिण सर्कलमध्ये ७४८२ वायफाय हॉटस्पॉट उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः बीएसएनएलचे प्रमुख वाय फाय प्लान कंपनी वायफायचा वापर करण्यासाठी अनेक वायफाय प्लान्सची ऑफर करते. याची किंमत ९ रुपयांपासून ६९ रुपयांपर्यंत आहे. ९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एका दिवसांची वैधता मिळते. तसेच १ जीबी डेटाचा वापर करता येवू शकतो. याप्रमाणे १९ रुपयांच्या प्लानमध्ये ३ दिवसांची वैधतेसोबत ३ जीबी डेटा, ३९ रुपयांच्या प्लानमध्ये ७ दिवसांची वैधतेसोबत ७ जीबी डेटा, ५९ रुपयांच्या प्लानमध्ये १५ दिवसांची वैधता आणि १५ जीबी डेटा मिळतो. तसेच ६९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांची वैधतेसोबत ३० जीबी डेटा मिळतो. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QdZPBH

Comments

clue frame