रोज २ जीबी डेटा-कॉलिंगचे प्लान, किंमत १४९ रुपयांपासून सुरू

नवी दिल्लीः जर तुम्हाला रोज १.५ जीबी डेटा पेक्षा जास्त डेटा हवा असेल आणि त्यासाठी तुम्हाला जास्त पैसेही खर्च करायचे नसतील तर तुम्ही रोज २ जीबी डेटाच्या प्लानचा वापर करू शकता. रिलायन्स जिओ पासून एअरटेल आणि वोडाफोन या कंपन्यांपर्यंत हे प्लान ऑफर करते. तर जाणून घ्या या तिन्ही कंपन्यांचे रोज २ जीबी डेटा प्लान रिचार्जसंबंधी. वाचाः रिलायन्स जिओचे रोज २ जीबी डेटाचे प्लान रिचार्ज रिलायन्स जिओ रोज २ जीबी डेटा देणारे पाच प्लान आहेत. या प्लानची किंमत २४९ रुपये, ४४४ रुपये, ५९९ रुपये, २३९९ रुपये आणि २५९९ रुपये आहे. या सर्व प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. २४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आहे. यात अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. ४४४ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी २००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. वाचाः ५९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी ३००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. २३९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. २५९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. यात अतिरिक्त १० जीबी डेटा आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वोडाफोनचा रोज २ जीबी डेटाचे रिचार्ज प्लान वोडाफोनचे तीन प्लान ऑफर केले आहेत. २९९ रुपये, ४४९ रुपये, आणि ६९९ रुपयांचे प्लान आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी डबल डेटा ऑफर करते. त्यामुळे रोज ४ जीबी डेटा मिळतो. तिन्ही प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉ़लिंग, रोज १०० एसएमएस वोडाफोन प्ले व झी५ चे फ्री सब्सक्रिप्सन मिळते. २९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. तसेच ६९९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. वाचाः एअरटेलचे रोज २ जीबी डेटाचे रिचार्ज प्लान एअरटेलचे नऊ प्लान आहे. यात १४९ रुपये, १७९ रुपये, २९८ रुपये, ३४९ रुपये, ४४९ रुपये, ५९९ रुपये, ६९८ रुपये, २४९८ रुपये आणि २६९८ रुपये. १४९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात विंक म्यूझिक व फ्री हेलोट्यून्सची सुविधा मिळते. १७९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यात फ्री हेलोट्यून्स व इन्शूरन्सची सुविधा मिळते. २९८ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम व फ्री हेलोट्यूनची सुविधा मिळते. वाचाः ३४९ रुपयांची प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात एअरटेल Xstream प्रीमियम व अॅमेझॉन प्राईम मेंबरशीपची सुविधा मिळते. ४४९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात एअरटेल Xstream प्रीमियम व फ्री हेलोट्यून्सची सुविधा मिळते. ५९९ रुपयांच्या प्लानची सुविधा ५६ दिवसांची आहे. यात एअरटेल Xstream प्रीमियम ची सुविधा मिळते. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः ६९८ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात एअरटेल Xstream प्रीमियम ची सुविधा व फ्री हेलोट्यून्स मिळते. २४९८ रुपयांच्या प्लानची वैधता ३५ दिवस आहे. तसेच यात एअरटेल Xstream प्रीमियम ची सुविधा मिळते. २६९८ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यात एअरटेल Xstream प्रीमियम व डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शनची सुविधा मिळते.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j1hgBM

Comments

clue frame