नवी दिल्लीः रिलायन्स फायबर (Reliance ) यूजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी चार नवीन प्लान आणले आहेत. हे प्लान ३९९ रुपये, ६९९ रुपये, ९९९ रुपये आणि १४९९ रुपयांचे आहेत. नवीन प्लानला लाँच करण्यासाठी कंपनीने सर्व नवीन युजर्ससाठी विना शर्थ ३० दिवस फ्री ट्रायल ऑफरची घोषणा केली आहे. वाचाः ३९९ आणि ६९९ रुपयांचे प्लान जिओ फायबरच्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये 30Mbps च्या स्पीड ने अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. प्लानच्या सब्सक्रायबर्सला अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगचा फायदा मिळतो. ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 100Mbps ची स्पीड ने ट्रूली अनलिमिटेड डेटा दिला जातो. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग मिळते. वाचाः ९९९ रुपये आणि १४९९ रुपयांचे प्लान जिओ फायबरच्या ९९९ रुपयांचा प्लान मध्ये 150Mbps ची इंटरनेट स्पीड मिळते. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग बेनिफिट दिला जातो. प्लानच्या सब्सक्रायबर्सला १ हजार रुपयांच्या किमतीचे ११ ओटोटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. तर दुसरीकडे जिओ फायबरच्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 300Mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा दिला जातो. अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगच्या या प्लानमध्ये १५०० रुपयांचे १२ ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः ३० दिवसांची फ्री ट्रायल जिओ फायबर आपल्या नवीन युजर्संना विना शर्त ३० दिवसांची फ्री ट्रायल ऑफर करीत आहे. यात 150Mbps ची स्पीड ने अनलिमिटेड इंटरनेट डेटा दिला जातो. प्लानमध्ये विना शूल्क ४के सेट टॉप बॉक्स सोबत १० ओटीटी अॅप्सचे अॅक्सेस दिले जाते. प्लानमध्ये युजर्सला फ्री व्हाईस कॉलिंग दिली जाते. ३० दिवसांच्या फ्री ट्रायल्स स्कीम चे खास वैशिष्ट्ये म्हणजेच पसंत न पडल्यास परत करता येवू शकते. वाचाः कंपनी १ सप्टेंबर पासून कनेक्शन आणि प्लान अॅक्टिवेट करण्यासाठी नवीन जिओ फायबर कस्टमर्सला ३० दिवसांची फ्री ट्रायल ऑफर करीत आहे. तसेच सध्याच्या युजर्संना नवीन टॅरिफ प्लानचे फायदे ऑफर करण्यासाठी अपग्रेड करीत आहे. तसेच १५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान फायबरशी जोडणाऱ्या युजर्संना माय जिओ व्हाउचरवर ३० दिवसांची फ्री ट्रायल बेनिफिट मिळणार आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32KPdA6
Comments
Post a Comment