नवी दिल्लीः रेडमीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन चा आज दुसरा सेल आहे. ९ हजार ९९९ रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आज ग्राहकांना मिळणार आहे. आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉन आणि शाओमीची अधिकृत वेबसाइट वरून हा फोन खरेदी करता येवू शकतो. फोनमध्ये दमदार बॅटरी, क्वॉड कॅमेरा सेटअप आणि ऑक्टा कोर प्रोसेसर यासारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. वाचाः रेडमी नोट ९ दोन व्हेरियंटमध्ये म्हणजेच ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनच्या ६४ जीबीच्या व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. फोन चार कलरच्या ऑप्शनमध्ये मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराईज फ्लेयर या कलरमध्ये येतो. वाचाः वाचाः रेडमी ९ प्राईमचे वैशिष्ट्ये या फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. ६.५३ इंचाचा आयपीएस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरीला ग्लास ३ प्रोटेक्शन दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 SoC प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमद्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येणाऱ्या या फोनमध्ये १८ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 5,020mAh बॅटरी दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31lp5fC
Comments
Post a Comment