सॅमसंगची भन्नाट ऑफर; फुटलेल्या फोन स्क्रीनच्या बदल्यात ५००० रु. डिस्काउंट

नवी दिल्लीः बऱ्याचदा युजर्सला डिस्प्ले क्रॅक झाल्यानंतरही फोनचा वापर करावा लागतो. कारण, क्रॅक फोनचा डिस्प्ले बदलने परवाडणारे नसते. तुटलेल्या स्क्रीनच्या फोनच्या बदल्यात कंपन्या डिस्काउंट देत नाही. परंतु, सॅमसंग ही ऑफर देतआहे. सॅमसंग इंडियाकडून ही जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ज्या फोनचा डिस्प्ले क्रॅक झाला आहे. त्या सॅमसंगच्या नवीन डिव्हाईसवर अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना क्रॅक स्क्रीनच्या फोनच्या बदल्यात ५ हजारांपर्यंत अपग्रेड बोनस दिला जात आहे. वाचाः अपग्रेड ऑफर युजर्संना सर्व डिव्हाइसेजवर दिला जात आहे. यात सॅमसंग शिवाय ब्रँड्सच्या तुटलेल्या स्मार्टफोनचा समावेश असू शकतो. सॅमसंगकडून ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ही ऑफर दिली जात आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra 5G ची प्री-बुकिंग करताना या अपग्रेडटा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. अपग्रेड ऑफर शिवाय या डिव्हाईसच्या प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑफर्स दिले जात आहे. वाचाः असा मिळणार ऑफरचा फायदा सॅमसंगच्या या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना सर्वात आधी My Galaxy App वर लॉग-इन किंवा साइन-अप करावे लागणार आहे. तसेच अॅपमध्ये देण्यात आलेल्या अपग्रेड बॅनरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुटलेल्या डिव्हाइस एन्टर करावे लागेल. प्रोसेस स्क्रीनवर दिसत असलेल्या 'Check Now' प्रॉम्प्ट वर टॅप केल्यानंतर ग्राहकांना डिव्हाईसची व्हॅल्यू दिसेल. तसेच ग्राहक आपल्या जवळच्या सॅमसंग स्टोरवर सुद्धा जावून फोनला अपग्रेड करू शकतात. त्यानतर त्यांना डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः हजारो रुपयांचे बेनिफिट्स नवीन Galaxy Note 20 सीरिजच्या स्टँडर्ड डिव्हाईसची किंमत ७७ हजार ९९९ रुपये आहे. सीरिजच्या हाय अँड मॉडल Galaxy Note 20 Ultra 5G ला भारतात १ लाख ४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. आतापासून या डिव्हाईसला सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर किंवा रिटेल स्टोर्सवर प्री बुकिंग केले जावू शकते. Galaxy Note 10 च्या प्री-बुकिंगवर ग्राहकांना ७ हजार रुपये आणि Galaxy Note 10 Ultra 5G च्या प्री-बुकिंग वर १० हजारांचे बेनिफिट्स मिळतात. तसेच अनेक बँक ऑफर्स ग्राहकांना दिले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aEl3lC

Comments

clue frame