शाओमीने लाँच केला स्मार्ट ओव्हन, जाणून किंमत-वैशिष्ट्ये

नवी दिल्लीः शाओमीने शुक्रवारी आपला MIJIA ब्रँड अंतर्गत एक नवीन प्रोडक्ट लाँच केले आहे. कंपनीने MIJIA Smart Oven लाँच केले आहे. याची क्राउडफंडिंग २६ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे. शाओमीच्या पोर्टफोलियोत आधी अनेक प्रोडक्ट होते. वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, कुकर आदीचा समावेश आहे. आता स्मार्ट ओव्हनचा सुद्धा यात समावेश झाला आहे. वाचाः वाचाः शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर सांगितले गेले आहे की, नवीन मीजिया स्मार्ट ओव्हनची क्षमता ३० लीटरची आहे. हे व्हर्टिकल बॉडी डिझाईनसोबत येते. वेगवेगळ्या प्रमाणे यात कुकिंग मोड देण्यात आले आहे. यात रोस्टिंग, स्टीमिंग, फ्राईंग चा समावेश आहे. तसेच याशिवाय स्टीम आऊटपूटसाठी ३० सेकंदाचा स्ट्यूंइंग दिला आहे. प्रोडक्ट एक स्मार्ट लिंकला सपोर्ट करतो. म्हणजेच याला मीजिया स्मार्ट होम अॅप्लिकेशनने कनेक्ट करता येवू शकते. वाचाः वाचाः शाओमीचा MIJIA स्मार्ट ओवन सिंगल कलर बॉडी मध्ये येतो. याची डिझाईन जबरदस्त आहे. याच्या वरच्या भागात डाव्या बाजुला सर्क्युलर डायल आहे. ज्याच्यावर सर्व गरजेची माहिती पाहिली जावू शकते. वाचाः कंपीनीची योजना या स्मार्ट ओव्हनला क्राउड फंडिंग द्वारे १२९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १४ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. तसेच याचे रिटेल किंमत १४९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास १६ हजार रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32eD4Do

Comments

clue frame