टेक्नो स्पार्क गो २०२० भारतात १ सप्टेंबर रोजी लाँच होणार

नवी दिल्लीः टेक्नो लवकरच भारतात आपला नवीन हँडसेट लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या स्मार्टफोनची माहिती देणे सुरू केले आहे. टेक्नोला नवीन फोनसाठी ई-कॉमर्स वेबसाइटवर मायक्रो साइट बनवली आहे. या माहितीनुसार, टेक्नोच्या नवीन फोनचे नाव असणार आहे. फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, हँडसेट १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. वाचाः आगामी टेक्नो फोन जानेवारीत लाँच करण्यात आलेल्या चे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हँडसेट ६.५२ इंचाचा डिस्प्ले असणार आहे, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. वाचाः टेक्नोकडून शेयर करण्यात आलेल्या फोनची डिझाईन समोर आली आहे. यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी नॉच आणि स्लिम बेजल दिसत आहे. फोनच्या खाली मायक्रो यूएसबी आणि डेटा सिंक, ३.५ एमएम ऑडियो जॅक तसेच मायक्रोफोन आहे. कंपनीने या फोटोसोबत 'Big B of entertainment'टॅगलाइनचा वापर केला आहे. यावरून संकेत मिळत आहेत की, फोनच्या वरच्या भागात वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन देण्यात आले आहेत. वाचाः फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जावू शकते. बॅटरी पूर्ण दिवसभर चालण्याची अपेक्षा आहे. हँडसेट संबंधी अद्याप जास्त माहिती नाही. कंपनीने लाँचची तारीख जाहीर केली नाही. परंतु, फोनच्या टीजरवरून माहिती होतेय की, फोन १ सप्टेंबर रोजी लाँच केला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EMaJMq

Comments

clue frame