नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी जिओनी (Gionee) भारतात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. जिओनी येत्या २५ ऑगस्टला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून केली जाणार आहे. फ्लिपकार्टने या संबंधी एक पोस्टर सुद्धा लाइव्ह केला आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी मिळू शकते, असे पोस्टरवरून दिसतेय. तसेच यात वॉटरड्रॉप नॉच असणार आहे. वाचाः किंमत ६ हजारांपेक्षा कमी जिओनीच्या या फोनची किंमत ६ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. स्मार्टफोन मध्ये 5,000mAh बॅटरी मिळू शकते. स्मार्टफोनची लाँचिंग २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे. करोना आल्याने ग्राहकांना बजेट स्मार्टफोनला पसंत करीत आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या बजेट फ्रेंडली आणि एन्ट्री लेवल स्मार्टफोन घेऊन येत आहे. वाचाः हा होता कंपनीचा शेवटचा फोन जिओनीने गेल्या एका वर्षभरात कोणताही मोठा स्मार्टफोन लाँच केलेला नाही. कंपनीने शेवटचा Gionee F205 Pro फोन लाँच केला होता. गेल्या वर्षी फेब्रुवारीत हा फोन लाँच करण्यात आला होता. फोनची सध्याची किंमत ४४९९ रुपये आहे. यात ५.४५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तसेच याचे रिझॉल्यूशन 720x1440 पिक्सल आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस १६ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. तसेच मीडियाटेक MT6739WW प्रोसेसर दिला आहे. वाचाः या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. अँड्रॉयड ८.१ ओरियोवर हा फोन काम करतो. या फोनमध्ये 3000mAh बॅटरी दिली आहे. फोन तीन कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू आणि शॅँपेन मध्ये उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YgcIQb
Comments
Post a Comment