वनप्लस नॉर्डचे युजर्स होताहेत त्रस्त, ब्लूटूथ देतोय धोका, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः वनप्लस कंपनीने आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची खूप चर्चा सुद्धा झाली आहे. स्वस्त किंमतीत लाँच झालेल्या स्मार्टफोनला रिलीज केल्यानंतर एका महिन्यानंतर त्यात पाच सिस्टम अपडेट्स दिले आहेत. सर्व अपडेट्समध्ये अनेक बग्स आणि सिस्टम संबंधित प्रॉब्लेम्स समोर आले आहेत. तसेच युजर्संना ब्लूटूथ कनेक्टिविटी संबंधी प्रोब्लेम येत असल्याने युजर्स त्रस्त होत आहेत. वाचाः जोरदार हाईप केल्यानंतर लाँच झालेल्या OnePlus Nord ला याच्या प्लास्टिक फ्रेमसाठी खूप टीका करण्यात आली आहे. त्यामुळे JerryRigEverything च्या ड्यूरेबिलिटी टेस्ट मध्ये फोन फेल झाला आहे. तसेच यात अनेक युजर्संनी फोनच्या डिस्प्लेत ग्रीन टिंट येत असल्याची तक्रार केली आहे. आता फोनच्या ब्लूटूथ कनेक्टिविटी संबंधित प्रोब्लेम येत असल्याने युजर्संना अडचणीचा सामना करावा लागत आहे. वाचाः कनेक्शन ड्रॉप होते वनप्लस कम्युनिटी शिवाय Reddit आणि Twitter वर खूप साऱ्या युजर्संनी लिहिले आहे की, त्यांच्या वर ब्लूटूथ पेयरिंग झाल्यानंतर काही मिनिटाच्या आत कनेक्शन ड्रॉप होत आहे. त्यामुळे युजर्संना आरामात म्यूझिक ऐकण्यास अडचण येत आहे. ब्लूटूथचे वायरलेस इयरफोनच्या मदतीने कॉलिंग करीत आहेत. PiunikaWeb च्या माहितीनुसार, एका युजरने सांगितले की, ब्लूटूथ कनेक्टिविटी संबंधित येत असलेली अडचण समोर आली आहे. ज्यावेळी ते 2.4GHz वाय-फायने कनेक्टेड होते. वाचाः वाचाः याआधीही आली अडचण OnePlus Nord कंपनीचा हा पहिला फोन नाही. ज्यात ब्लूटूथ कनेक्टिविटीसाठी युजर्संना अडचण आली आहे. याआधी OnePlus 5, OnePlus 5T आणि OnePlus 6 यूजर्संना अशाच अडचणीचा सामना करावा लागला आहे. ब्रँडकडून या समस्येवर अद्याप काही म्हटले गेले नाही. परंतु, ही अडचण सॉफ्टवेयर अपडेट किंवा खराब युनिटच्या सर्विस किंवा रिप्लेसमेंटने फिक्स केली जावू शकते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32wy5y6

Comments

clue frame