नोकिया १२५ आणि नोकिया १५० भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः आणि Nokia 150 (2020) फीचर फोन्स भारतात लाँच करण्यात आले आहे. हे दोन्ही एन्ट्री लेवल फोन्स मे महिन्यात ग्लोबली लाँच करण्यात आले होते. दोन्ही फीचर फोन हे ड्यूल सिम सपोर्ट करतात. यासाठी कंपनीने नोकिया ५.३ आणि नोकिया सी १ दोन्ही स्मार्टफोन्सला सुद्धा कंपनीने आज भारतात लाँच केले आहे. वाचाः Nokia 125, Nokia 150 (2020): ची किंमत नोकिया १२५ ला देशात १९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हा फोन चारकोल ब्लॅक आणि पाउडर व्हाइट कलरमध्ये मिळणार आहे. तर नोकिया १५० (२०२०) ची किंमत २२९९ रुपये आहे. हा हँडसेट स्यान, ब्लॅक आणि रेड कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. दोन्ही फीचर फोनची विक्री आजपासून देशातील मोठ्या रिटेलर्स आणि Nokia.com वर सुरू करण्यात आली आहे. वाचाः Nokia 125:ची वैशिष्ट्ये नोकिया 125 Series 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात २.४ इंचाचा QVGA कलर डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये फिजिकल कीबोर्ड आणि नेविगेशन बटन दिले आहे. हँडसेटमध्ये MTK CPU आहे. रॅम आणि स्टोरेज ४ एमबी आहे. नोकिया १२५ मध्ये कॅमेरा देण्यात आला नाही. वाचाः नोकियाच्या या फोनमध्ये 1020mAh रिमूवेबल बॅटरी दिली आहे. नोकियाचा दावा आहे की, ही बॅटरी १९.४ तासांपर्यंत टॉकटाईम आणि २३.४ तासांपर्यंत स्टँडबाय टाईम देते. नोकिया १२५ मध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक, एफएम रेडियो आहे. फोनचे डायमेंटेशन 132x50.5x15 मिलीमीटर आहे. वाचाः Nokia 150 (2020): ची वैशिष्ट्ये नोकियाच्या Nokia 150 (2020) फोनमध्ये नोकिया १२५ चे सर्व वैशिष्ट्ये आहेत. परंतु, रियरवर फ्लॅश सोबत व्हीजीए कॅमेरा दिला आहे. ३२जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये MP3 प्लेयर आणि ब्लूटूथ 3.0 कनेक्टिविटीसाठी दिले आहेत. नोकिया १५० (२०२०) चे डायमेंशन 132x50.5x15 मिलीमीटर आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EvJjdJ

Comments

clue frame