जगात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा भारतात, सर्वात महाग डेटा या देशात

नवी दिल्लीः जगभरात वेगवेगळ्या सर्विस प्रोव्हाईडर्सकडून ऑफर करण्यात येत असलेला मोबाइल डेटाची सर्वात कमी किंमत भारतात आहे. याचाच अर्थ जगभराच्या तुलनेत सर्वात स्वस्त डेटा भारतात मिळतो. तसेच याशिवाय, नोव्हेंबर २०१८ च्या तुलनेत भारतात प्रती १ जीबी मोबाइल डेटाची किंमत जवळपास ६५ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतात जास्तीत जास्त टेलिकॉम कंपन्याकडून डेली डेटा ऑफर करणारे प्लान दिले जात आहे. वाचाः यूके बेस्ड फर्म Cable.co.uk च्या २०२० वर्ल्डवाइड मीडिया डेटा प्राइसिंग रिपोर्ट मधून ही माहिती समोर आली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, भारतात प्रती गीगाबाईट युजर्सला केवळ ६.७ रुपये (०.९ डॉलर) रक्कम द्यावी लागते. जी जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तसेच २०१८ मध्ये प्रती १ जीबी डेटासाठी १८.५ रुपये मोजावे लागत होते. जी दोन वर्षात ६५ टक्के कमी झाली आहे. वाचाः भारतात युजर्सला सर्वात जास्त डेटा यूएसमध्ये १ जीबी डेटा साठी युजर्सला ८ डॉलर (५९४ रुपये आणि यूकेत १.४ डॉलर म्हणजेच १०४ रुपये मोजावे लागतात. डेटाच्या ग्लोबल कॉस्ट म्हणजेच जगभरातील किमतीची साधारणपणे डॉलर (जवळपास ३७२ रुपये) प्रति जीबी आहे. स्टडी करणाऱ्या फर्म Cable.co.uk के कंज्यूमर टेलिकॉम्स एनालिस्ट डॅन हॉडल ने सांगितले की, भारतात टेलिकॉम ऑपरेटर्स आधीच्या तुलनेत जास्त डेटा पॅक ऑफर करीत आहेत. वाचाः या ठिकाणी सर्वात महाग मोबाइल डेटा स्टडीसाठी ३ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२० या दरम्यान वेगवेगळ्या देसात ५५५४ मोबाइल डेटा प्लानचा सर्वे करण्यात आला आहे. सर्वात महाग डेटा सेंट हेलेना आयलँडमध्ये आहे. या ठिकाणी १ जीबी साठी ५२.५ डॉलर (जवळपास ३८९७ रुपये) मोजावे लागतात. स्रवात स्वस्त डेटा पॅकच्या टॉप १० देसात श्रीलंका आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. भारतात कंपन्या स्वस्त प्लान ऑफर करीत आहेत. पुढील सहा महिन्यात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोनकडून प्लान महाग करण्यात येण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34tLCci

Comments

clue frame