सॅमसंगची नवी सीरीज भारतात लाँच, प्री बुकिंगवर २१००० रुपयांपर्यंत बेनिफिट्स

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाच्या स्मार्टफोन ब्रँड सॅमसंगकडून गेल्या काही दिवसांपासून सर्वात पॉवरफुल गॅलेक्सी नोट सीरीज लाँच करण्यात आली आहे. आज भारतात ही सीरीज लाँच करण्यत आली आहे. प्रीमियम Galaxy Note 20 सीरीज अंतर्गत आज इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये तसेच डिव्हाईसेजची प्री बुकिंग २७ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. नवीन सीरीज अंतर्गत Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra 5G प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनी वेगवेगळे ऑफर्स देत आहे. वाचाः Galaxy Note 20 सीरीजची किंमत-ऑफर्स पॉवरफुल सॅमसंग सीरीजचे दोन फोन भारतीय मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे. याची प्री बुकिंग आधीच सुरू करण्यात आली आहे. Galaxy Note 20 ची किंमत ७७ हजार ९९९ रुपये आहे. तर Galaxy Note 20 Ultra 5G ला भारतात १ लाख ४ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. Galaxy Note 20 ला मिस्टिक ब्लू, मिस्टिक ब्रॉन्ज आणि मिस्टिक ग्रीन कलर मध्ये खरेदी करता येवू शकते. तर Galaxy Noyte 20 Ultra 5G मिस्टिंक ब्रॉन्ज आणि मिस्टिक ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. वाचाः सॅमसंगच्या नवीन नोट सीरीजसाठी भारतात ५ लाख लोकांनी प्री रजिस्ट्रेशन केले आहे. सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोर आणि रिटेल आउटलेट्स दोन्ही वर प्री बुकिंग २७ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. Galaxy Note 20 ची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ७ हजार रुपयांचे बेनिफिट्स मिळणार आहे. तर Galaxy Note 20 Ultra 5G च्या प्री-बुकिंग वर १० हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले जाणार आहे. या बेनिफिट्सला सॅमसंगच्या शॉप अॅपवर Galaxy Buds+, Galaxy Buds Live, Galaxy Watches आणि Galaxy Tabs वर रिडीम केले जावू शकते. वाचाः तसेच HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरुन पेमें करणाऱ्या ग्राहकांना कॅशबॅक ऑफर दिला जात आहे. Galaxy Note 20 वर 6000 रुपये आणि Galaxy Note 20 Ultra 5G वर ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. गॅलेक्सी युजर्सला ५ हजारांपर्यंत अपग्रेड ऑफर सुद्धा दिला जात आहे. तसेच ३ हजार ९९९ रुपये किंमतीचा Samsung Care+ ADLD ला ५० टक्के डिस्काउंटसोबत खरेदी करता येवू शकते. याप्रमाणे ग्राहकांना २१ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळतात. वाचाः Galaxy Note 20 सीरीजचे वैशिष्ट्ये सॅमसंगच्या नवीन नोट सीरीजच्या Galaxy Note 20 मध्ये ६.७ इंचाचा सुपर AMOLED+ इनफिनिटी-ओ डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 2400x1080 पिक्सल्स आहे. Galaxy Note 20 Ultra 5G मध्ये ६.९ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायनमिक AMOLED 2X इनफिनिटी-ओ डिस्प्ले (3088X1440) दिला आहे. दोन्ही फोनमध्ये Exynos 990 प्रोसेसर आणि S-पेन स्टायलस मिळतो. दोन्ही फोनमध्ये IP68 डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंस रेटिंग देण्यात आली आहे. यात Samsung DEX देण्यात आले आहे. वाचाः या दोन्ही फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. में 108 मेगापिक्सल प्राइमरी वाइड अँगल कॅमेरा दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर दिले आहेत. यात लेजर ऑटोफोकस सुद्धा दिला आहे. या फोनमध्ये 8K विडियो रिकॉर्डिंग सपोर्ट दिला आहे. 120FPS फुल एचडी रिकॉर्डिंग केली जावू शकते. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेजच्या फोनमध्ये जेस्चर्स सपोर्ट दिला आहे. Galaxy Note 20 मध्ये 4300mAh आणि Galaxy Note 20 Ultra 5G मध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hrajK9

Comments

clue frame