शाओमीचा स्वस्त स्मार्टफोन येतोय, २७ ऑगस्टला भारतात लाँचिंग

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमी येत्या २७ ऑगस्ट रोजी भारतात नवीन स्मार्टफोन रेडमी ९ Redmi 9 लाँच करीत आहे. रेडमीने आपल्या ट्विटर हँडलवरुन याची माहिती सांगितली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केलेल्या रेडमी ९ ला कंपनीने भारतात Redmi 9 Prime नावाने लाँच केले आहे. परंतु, आता २७ ऑगस्टला भारतात लाँच करण्यात येणारा रेडमी ९ फोन हा मलेशियात लाँच केलेल्या Redmi 9c चा थोडा बदल केलेला स्मार्टफोन असेल, असे सांगितले जात आहे. वाचाः भारतात २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर म्हटले की, रॅम आणि जास्त स्टोरेज मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये स्क्वायर शेप सोबत ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. वाचाः काय असतील रेडमी ९ चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा HD+ डिस्प्ले असणार आहे. ज्यात वॉटरड्रॉप नॉच दिला जाईल. फोनमध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅम सोबत ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज दिला जाणार आहे. हा मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर मिळणार आहे. यात अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम वर आधारीत MIUI 11 यूजर इंटरफेस मिळणार आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळणार आहे. १० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. तसेच रियरमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात येणार आहे. वाचाः वाचाः रेडमी ९सी मध्ये ट्रिपल रियर कॅमररा देण्यात आला होता. परंतु, भारतात लाँच करण्यात येणाऱ्या रेडमी ९ फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा मिळू शकतो. रियर कॅमेऱ्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32dMH54

Comments

clue frame