रेडमी ९ स्मार्टफोनचा आज भारतात पहिला सेल

नवी दिल्लीः रेडमी ९ () स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. गेल्या आठवड्यात भारतात या फोनला लाँच करण्यात आले होते. आज दुपारी १२ वाजता अॅमेझॉन आणि mi.com वरून या फोनला खरेदी करता येवू शकणार आहे. या फोनमध्ये दोन रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः रेडमी ९ चे वैशिष्ट्ये फोनमध्ये 720x1600 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. ६.५३ इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. ४ जीबी रॅमच्या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ३५ एसओसी प्रोसेसर मिळतो. यात ड्यूल नॅनो सिम सपोर्ट येत असून हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 12 ऑफर केला आहे. वाचाः फोनच्या रियरमध्ये फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे दिले आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फोन १० वॉटच्या चार्जिंगला सपोर्ट करतो. फोन कार्बन ब्लॅक, स्काय ब्लू आणि स्पोर्टी ऑरेंज या तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. वाचाः कनेक्टिविटीसाठी रेडमी ९ मध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि मायक्रो यूएसबी पोर्ट यासारखे ऑप्शन देण्यात आले आहे. फोन चे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात 3.5mm ऑडियोजॅक दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jm1hP4

Comments

clue frame