नवी दिल्लीः स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये अॅपल जगात नंबर वन कंपनी बनली आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, २०२० च्या पहिल्या ६ महिन्यात (जानेवारी ते जून) मध्ये ग्लोबल मार्केटचे अर्धे रिवेन्यू अॅपलच्या नावावर राहिले आहे. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३.२ टक्के जास्त आहे. कोविड - १९ महामारी आणि लॉकडाऊन या दरम्यान अॅपल आपल्या शिपमेंटमुळे मार्केटमध्ये लीडर बनले आहे. कारण, दुसऱ्या कंपन्यांच्या शिपमेंटपेक्षा खूप जास्त आहे. वाचाः अॅपलवर करोनाचा परिणाम नाही एकीकडे संपूर्ण इंडस्ट्री करोनामुळे ठप्प पडलेली असताना अॅपलने आपल्या शिपमेंट्स व्हॅल्यूम मध्ये २२ टक्के इयर ऑन इयर वाढ मिळवली आहे. कोविड-१९ मुळे अॅपलचे मार्केट आणि रिवेन्यू कमी झाला नाही. उलट या वर्षाच्या सहामाही मध्ये याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसले आहे. वाचाः दुसऱ्या नंबरवर गार्मिन स्मार्टवॉच मार्केटमध्ये (गार्मिन) दुसऱ्या नंबरवर राहिली आहे. २०२० च्या पहिल्या सहा महिन्यात गार्मिन दुसरी सर्वात जास्त कमाई करणारी कंपनी ठऱली. याचे सर्वात मोठे कारण, म्हणजे कंपनीकडे सध्या स्मार्टवॉचची मोठी रेंज आहे. स्मार्टवॉच सेगमेंटमध्ये हुवावे आणि सॅमसंग तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले आहे. तर Imoo काउंटरपॉइंट या लिस्टमध्ये पाचव्या आणि अमेजफिट सहाव्या स्थानवर राहिले आहे. फिटबिट आणि फॉसिल सातव्या आणि आठव्या स्थानावर राहिले आहे. वाचाः अॅपल वॉच सीरिज ५ बेस्ट सेलिंग मॉडल बेस्ट सेलिंग स्मार्टवॉचच्या रँकिंग मध्ये अॅपल वॉच सीरीचजे ५ बेस्ट सेलिंग मॉडल आहेत. याच्यानंतर सेलच्या विक्रीत दुसऱ्या नंबरवर अॅपल वॉच ३ आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या हुवावे वॉच GT 2 तिसऱ्या आणि गॅलेक्सी वॉच अॅक्टिव २ ला दुसरे स्थान मिळाले आहे. या यादीत ५ व्या स्थानावर Imoo Z3 4G स्मार्टवॉच आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l7PyFg
Comments
Post a Comment