मस्तच! WhatsApp मेसेज आपोआप होणार डिलीट, घ्या जाणून

नवी दिल्लीः WhatsApp वर लवकरच सेल्फ डिस्ट्रक्टिंग ()रिपो मेसेजिंग फीचर येत आहे. युजर्संना या फीचरची फार दिवसांपासून उत्सुकता लागली आहे. लेटेस्ट अँड्रॉयड बीटा अॅप मध्ये आलेल्या अपडेटवरून ही माहिती उघड झाली आहे. या फीचरवर सध्या काम सुरू आहे. अधिकृत लाँच होण्याआधी या फीचरला आणखी चांगले बनवले जात आहे. वाचाः WABetainfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप मध्ये हे फीचर Expiring messages नावाने येणार आहे. याआधी आलेल्या अँड्रॉयड अपडेटमध्ये या फीचरला Expiring messages म्हणून पाहिले गेले होते. लेटेस्ट व्हर्जन 2.20.197.4 मध्ये यूजर्स Settings मध्ये Expiring messages ला इनेबल करू शकतो. या फीचरद्वारे युजर्संना सात दिवसांनंतर चॅटमध्ये ऑटो डिलीट मेसेज फीचरचा वापर करता येवू शकेल. वाचाः दुसऱ्या अॅपपेक्षा वेगळा असेल व्हॉट्सअॅपचे डिस्ट्रिक्टिंग फीचर जुन्या बीटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅप एक्सपायरिंग मेसेज फीचर वैयक्तिक चॅट्ससोबत ग्रुप चॅट्ससाठी उपलब्ध होणार आहे. या फीचरचे उद्देश स्नॅपचॅट यासारखे अॅप्सवर सध्याच्या सेल्फ डिस्ट्रक्टिंग मेसेज पेक्षा थोडे वेगळे असणार आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचे ध्येय जुन्या चॅट्सला ऑटो डिलिट करणे आणि चॅट्स ओव्हरऑल अॅपला हलके करणे होय. नवीन व्हर्जन मध्ये चॅट डिलीट करण्यासाठी ७ दिवसांची वेळ मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर व्हॉट्सअॅप ऑटो डिलीट मेसेजसाटी १ तास, १ दिवस, १ आठवडा, १ महिना आणि १ वर्षाचे ऑप्शन युजर्संना देण्यात येणार आहेत. वाचाः अनेक फीचरवर काम सुरू व्हॉट्सअॅपचे आणखी एक फीचर Mute Always वर काम सुरू आहे. या फीचरद्वारे युजर्स नेहमी साठी एखाद्या ग्रुपला म्यूट करू शकतात. आता व्हॉट्सअॅप युजर्स एका वर्षांपर्यंत कोणत्याही ग्रुपला म्यूट करु शकतात. तसेच आणखी एक मल्टि डिव्हाईस सपोर्ट येणार आहे. या फीचरद्वारे सिंगल फोन नंबर सोबत आपल्या व्हॉट्सअॅप अकाउंटला युज करु शकतात. व्हॉट्सअॅप वेबद्वारे डेस्कटॉवर व्हॉट्सअॅपला मिरर करता येवू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f9xwhP

Comments

clue frame