नवी दिल्ली - पावसाळ्याच्या दिवसात वीजा चमकने ही बाब सामान्य असते. मात्र तुम्ही एखादी लायटिंगची माळ लावावी अशा पद्धतीनं वीज चमकत असल्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? नासाचे (NASA) अंतराळवीर बॉब बेनकेन (Bob Benken) हे सध्या आतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Centre) असून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर एक अद्भुत व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
बेनकेन यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये काळे ढग दिसत आहेत. पृथ्वीपासून वर 400 किलोमीटर अंतरावरून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. यामध्ये वीज चमकताना दिसत असून ती एखादी माळ लावल्यासारखीच भासत आहे. बेनकेन यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ फक्त 9 सेंकदाचा आहे.
हे वाचा - NASA ला अंतराळात पहिल्यांदाच सापडला अनोखा कोरोना
व्हिडिओ 22 जुलैला शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखाहून अधिक वेळा तो पाहिला गेला. अंतराळातून दिसणारा हा अद्भुत नजारा लोकांनी शेअर केला आहे. या व्हिडिओसाठी बेनकेन यांचे आभारही लोकांनी मानले आहेत.
Lightning from above. The violet fringes are mesmerizing. pic.twitter.com/eLCGMTbfTY
— Bob Behnken (@AstroBehnken) July 21, 2020
बेनकेन हे त्या दोन अंतराळवीरांपैकी एक आहेज ज्यांनी मे महिन्यात स्पेस एक्सच्या पहिल्या चालक दलाच्या उड्डाणातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची मोहीम केली होती. ते डग हर्ले यांच्यासोबत अंतराळ मोहिमेवर गेले होते.
हे वाचा - खरंच पृथ्वीचा विध्वंस करू शकतात का Asteroid ? जाणून घ्या
दोघांनीही अंतराळातून पृथ्वीची अनेक अद्भुत दृश्ये शेअर केली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला बेनकेनने धुमकेतू नॉयसची काही दृश्ये शेअर केली होती. नॉयस पृथ्वीच्या जवळ एका बिंदुसारखा दिसत होता. दोन्ही अंतराळवीर 1 ऑगस्टला पृथ्वीवर परत येण्यासाठी निघतील.
from News Story Feeds https://ift.tt/2ZNAZyf
Comments
Post a Comment