नवी दिल्लीः फ्लिपकार्टने एक नवीन Nokia डिव्हाईस संबंधी माहिती दिली आहे. नोकियाच्या या डिव्हाईसमधून कोणताही साधा टीव्ही स्मार्ट टीव्हीत रुपांतरीत होऊ शकेल. फ्लिपकार्टने शॉर्ट टीझर व्हिडिओ जारी केला आहे. ज्यात लिहिले आहे की, तुमच्या टीव्हीला स्मार्ट बनवण्यासाठी काही खास रोचक येत आहे. वाचाः टीझर व्हिडिओतून संकेत मिळत आहेत की, तुम्हाला असे करण्यासाठी आपल्या टीव्हीला अपग्रेड करण्याची गरज नाही. याचाच अर्थ नोकियाच्या नवीन डिव्हाईस एक स्मार्टबॉक्स सारखा असेल. जो आपला रेग्युलर टीव्हीला एक स्मार्ट टीव्हीत रुपांतरीत करणार आहे. शाओमी मी बॉस्क ४के प्रमाणे नवीन डिव्हाईस घेऊन येण्याची तयारी करीत आहे. या वेळी जास्त जाणून घेण्यासाठी इच्छूक युजर्ससाठी फ्लिपकार्ट टीझर मध्ये लिहिले आहे. अपडेटसोबत आमच्या सोबत कनेक्ट राहा. वाचाः १० सेकंदाच्या टीझर व्हिडिओत नवीन नोकिया डिव्हाईस मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. नवीन डिव्हाईसमध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट, अँड्रॉयड 9 पाय, गूगल असिस्टेंट सपोर्ट, गेमिंग ऐप्स, डॉल्बी ऑडियो आणि OTT अॅप्सचे सपोर्ट मिळणार आहे. टीझरवरून माहिती होतेय की, हे सर्व फीचर्स टीव्हीत कोणताही बदल केल्याशिवाय मिळतील. वाचाः फ्लिपकार्टने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये अँड्रॉयड ९ पाय वर चालणाऱ्या स्मार्ट टीव्हीला लाँच करण्यासाठी नोकियासोबत एक ब्रँड लायसन्स पार्टनरशीप केली होती. नोकियाने ५५ इंचाचा ४ के पॅनल आणि जीबीएल स्पीकर्सचा टीव्ही लाँच केला आहे. याची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः आता नोकिया आणि फ्लिपकार्टची या पार्टनरशीपला एक्सटेंड केले आहे. मिस्टिरियस नवीन नोकिया डिव्हाईसकडून खूप सारे युजर्सची मदत मिळणार आहे. ज्या युजर्सकडे स्मार्ट टीव्ही नाहीत परंतु, याचा आनंद घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी हे नवीन डिव्हाईस खूप चांगले काम करणार आहे. याच्या आणखी माहितीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30NA00g
Comments
Post a Comment