महागड्या स्मार्टफोनची अनुभूती देणारा 'परवडेबल' OnePlus Nord लॉन्च; कधी अन् कितीला मिळणार?

नवी दिल्ली : OnePlus Nord स्मार्टफोन भारतासह अन्य बाजारात नुकताच दाखल झालाय. अफॉर्डेबल प्रिमियर फीचर्सच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. कमी किंमतीमध्ये  OnePlus Nord मध्ये  टॉप-फीचर्स देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कंपनीने केलाय. वनप्लस नॉर्डचा लूक हा महागड्या स्मार्टफोनची अनुभूती देणारा आहे. जाणून घेऊयात सर्वात स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या वनप्लसच्या खास फीचर्स आणि किंमतीसंदर्भातील माहिती...

...तर हेडफोन आणि चार्जरशिवाय मिळणार iPhone; नव्या ग्राहकांना बसू शकतो फटका

  • वनप्लस नॉर्ड  IP रेटिंगसह लॉन्च केलेला नाही. त्यामुळे हा स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध करुन देणे शक्य झाले. कमी किंमतीत ग्राहकांना उत्तम स्मार्टफोन उपलब्ध करुन देणे हाच नॉर्ड सीरीज लॉन्च करण्यामागे उद्देश आहे. 
  • भारतामध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. भारतातील मागणी लक्षात घेऊनच हा निर्णय कंपनीने घेतलाय. भातातील लोक स्मार्टफोन खरेदी करताना फीचर्सपेक्षा अधिक किंमतीचा विचार करतात. भारतात 6 जीबी रॅमसह अनेक स्मार्टफोन यापूर्वीही बाजारात आले आहेत. या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी सप्टेंबरमध्ये वन प्लसचे नवे मॉडेल ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध होईल.  
  • वनप्लस नॉर्डमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश नाही. त्यामुळे स्मार्टफोन कमी किंमतीती उपलब्ध करुन देणे कंपनीला शक्य झाले आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने  नव्या वनप्लस बड्स खरेदी करण्याकडेही आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. कंपनीने लॉन्च केलेल्या वनप्लस बड्सची किंमत 4,990 रुपये इतकी आहे.
  • समोरील बाजूस दोन कॅमेरा सेटअपअ असणारा वनप्लस कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन असेल. सेल्फीसाठी समोरच्या बाजूला 32 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल वाइड अँगल सेकंडरी लेन्सचा समावेश आहे.  
  • OnePlus Nord मध्ये वनप्लस 8 सारखा प्रायमरी रियर कॅमरा आहे।  याशिवाय 48 मेगापिक्सल 48MP Sony IMX586 इमेज सेंसर आहे। हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर 2 मेगापिक्सल मॅक्रो आण 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देखील आहे.
  • वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन्सप्रमाणेच नॉर्डलाही दोन वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट आणि 3 वर्षांपर्यंत सेक्युरिटी अपडेट्स मिळतील.
  • फ्लगशिप वनप्लस 8 सीरीजप्रमाणे  नॉर्ड 5G सपॉर्टेबल आहे. फोन में क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर असून स्नॅपड्रॅगन 730G च्या तुलनेत जवळपास 30 टक्के वेगाने ग्राफिक्स रेंडर करु शकतो. 
  • OnePlus Nord ची भारतातील किंमत 
  • वनप्लसच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंट 27,999 रुपये , 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरियंट 29,999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्मार्टफोन ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनिक्स कलरमध्ये उपलब्ध असेल.  


from News Story Feeds https://ift.tt/32GCP5J

Comments

clue frame