नवी दिल्लीः वनप्लस (OnePlus) ने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. हा आहे. वनप्लसच्या स्मार्टफोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन आणि OnePlus.in आणि वनप्लस एक्सपीरियंस स्टोर्स वर ४ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. हा फोन १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज सोबत येतो. वनप्लसचा हा स्वस्तातील स्मार्टफोन OxygenOS 10.5 पर बेस्ड अँड्रॉयड 10वर चालतो. वाचाः या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर दिला आहे. वनप्लस ८ सीरीज प्रमाणे OnePlus Nord स्मार्टफोन मध्ये ५जी सपोर्ट दिला आहे. वाचाः स्मार्टफोनची किंमत OnePlus Nord स्मार्टफोन ६ जीबी रॅम प्लस ६४ स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज या तीन व्हेरियंटमध्ये आले आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा व्हेरियंट केवळ भारतात लाँच करण्यात आला आहे. याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन सप्टेंबर मध्ये उपलब्ध होणार आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही व्हेरियंट ४ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. सर्व प्रमुख बँकेच्या कार्डवर नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन मिळणार आहे. तर जिओ युजर्संना ६ हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळतील. वाचाः दोन कलरमध्ये OnePlus Nord फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोनच्या बॅकला आणि फ्रंटला कॉर्निंग गोरीला ५ ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे. वाचाः या फोनमध्ये ६ कॅमेरे OnePlus Nord च्या बॅकला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर दिला आहे. तसेच फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. फोनच्या फ्रंटला २ कॅमेरे दिला आहे. फोनच्या फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड इमेज सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WFTWRB
Comments
Post a Comment