नवी Mahindra Scorpio कधी लाँच होणार? जाणून घ्या गाडीची फीचर्स

नवी दिल्ली - महिंद्रा स्कॉर्पिओच्या नव्या मॉडेलची बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. न्यू - जनरेशन स्कॉर्पिओ देशात याआधी अनेकदा टेस्टिंगवेळी पाहण्यात आली आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नव्या स्कॉर्पिओच्या लूकमध्ये मोठे बदल दिसणार आहेत. तसंच यामध्ये नवीन इंटेरिअर आणि नविन इंजिन ऑप्शन असतील. महिंद्रा फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही गाडी लाँच करेल अशी आशा होती. मात्र आता पुढच्या वर्षीपर्यंत नव्या स्कॉर्पिओची वाट पहावी लागेल.

न्यू जनरेशन स्कॉर्पिओला झेड 101 कोडनेम देण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, नवी महिंद्रा स्कॉर्पिओ 2021 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये लाँच होईल. याआधी महिंद्राने दोन नवीन एसयुव्ही लाँच करेल. यामध्ये न्यू जनरेशन थार आणि न्यू जनरेशन XUV500 यांचा समावेश आहे. नवीन थार या वर्षी ऑक्टोबरमध्ये आणि नवीन XUV500 पुढच्या वर्षी तिमाहीत लाँच होईल. 

हे वाचा - सरकारने मोटार व्हेइकलच्या नियमात केला मोठा बदल

न्यू जनरेशन स्कॉर्पिओमध्ये नवीन 2.2 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. यातून 160bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जेनरेट करते. हे नवं इंजिन थार आणि न्यू XUV500 मध्येही देण्यात आलं आहे. यासोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळणार आहे. एसयुव्हीच्या पेट्रोल मॉडेलमध्ये नवीन 2.0 लीटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळणार आहे. यासोबत 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार आहे. 

नवी महिंद्रा स्कॉर्पिओ बॉडी ऑन लॅडर फ्रेमच्या मॉडिफाइड व्हर्जनवर आधारीत असेल. या प्लॅटफॉर्मचा वापर नव्या थारमध्येही असेल. टेस्टिंग होत असतानाचे फोटो व्हायरल झाले असून त्यात असं दिसत आहे की, नवी स्कॉर्पिओ सध्याच्या मॉडेलपेक्षा लांबी आणि रुंदीला जास्त असेल. 

हे वाचा - नव्या जनरेशनची होंडा सिटी लाँच, भारतात पहिल्यांदाच कारमध्ये दिलंय अनोखं फीचर

सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत न्यू जनरेशन स्कॉर्पिओमध्ये जास्त प्रिमियम फीचर्स असणार आहेत. यामध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टसह नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, रिव्हर्स कॅमेरा, इलेक्ट्रिक सनरूफ, लेदर सीट्स आणि हेड अप डिस्प्लेसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. 



from News Story Feeds https://ift.tt/2CZ4Kmy

Comments

clue frame