ट्विटरला टक्कर देणारं भारतीय 'Koo' लाँच

नवी दिल्ली - चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर भारतात अनेक नवीन अॅप तयार होत आहेत. मेड इन इंडियासाठी प्रोत्साहन दिलं जात असताना देशातील लोकसुद्धा भारतीय अॅपचा वापर करण्याकडे वळले आहेत. यामुळे युजर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. टिकटॉकसारख्या अॅपसारखी अनेक भारतीय अॅप उपलब्ध होती. आता टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या भारतीय अॅपचा वापर वाढत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसारखेच भारतीय अॅप लाँच झाले आहे. कू अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. 

भारतात आता लँग्वेज बेसड मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सध्या हळू हलू वाढत आहे. यामध्येच koo App लाँच झालं असून भारतीयांना आपल्या भाषेत पोस्ट शेअर करण्यासाठी यामुळे प्लॅटफॉर्म मिळणार आहे. एका रिपोर्टनुसार भारतात सध्या सर्वाधिक लोक इंग्रजीऐवजी मातृभाषेत पोस्ट करणं किंवा मत व्यक्त करण्याला प्राधान्य देतात. कू अॅपवरूनही मातृभाषेत पोस्ट आणि ट्रेंड पाहता येतील. कू अॅप हे ट्विटरसारखंच असून यामध्ये पोस्टसोबत फोटो आणि व्हिडिओसुद्धा अॅड करता येतो. ट्विटप्रमाणेच इथंही फॉलोअर्स, कमेंट, लाइक पर्याय आहेत. तसंच ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्ट असे तीन पर्याय पोस्ट कऱण्यासाठी मिळतात. 

हे वाचा - नवी टेक्नोलॉजीमुळे तुमचा फोन होणार फास्ट रिचार्ज

कंपनीने सध्या चार भाषांमध्ये हे अॅप लाँच केलं आहे. हिंदी, तामिळ, कन्नड आणि तेलगु भाषेत असलेलं हे अॅप मराठी, गुजराती, आसामीसह इतर भाषांमध्येही येईल. कंपनीने कू अॅप अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही युजर्ससाठी लाँच केलं आहे. कू अॅपचा वापर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय लोकांनीही सुरू केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासह अनेक दिग्गज कू अॅपवर आहेत. 

टिकटॉकला पर्यायी 10 अॅप
 टिकटॉकच्या बंदीनंतर तुम्हाला टिकटॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप  हवे असतील तर भारतीय अ‍ॅप्स उपलब्ध झालेले आहेत. मेड इन इंडिया असलेल्या या अ‍ॅप्समध्ये तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता. रिझल (Rizzle), चिंगारी (Chingari) , रोपोसो (Roposo), एमक्स टकाटक (MX TakaTak) ,  ट्रेल (Trell), मोज अ‍ॅप (Moj App), बोलो इंडिया अ‍ॅप (Bolo India) , मित्रो अ‍ॅप (Mitron App), लिट लॉट (LitLot) , हॉटशॉट (HotShots) ही अॅप्स टिकटॉकला पर्याय म्हणून समोर आली आहेत. 



from News Story Feeds https://ift.tt/3jYtexp

Comments

clue frame