भारतात iPhone 11 च्या निर्मितीमुळे चीनला बसणार दणका

नवी दिल्ली - भारत चीन सीमेवर चीनने केलेल्या आगळीकीनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. यातच चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहिमसुद्धा सुरू झाली होती. दरम्यान, भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली. त्यानंतर आता देशात जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी भारतात त्यांच्या प्रोडक्टचे उत्पादन करणार आहे. यामुळे अॅपलचे चीनवर असलेलं अवलंबित्व कमी होईल. आयफोन तयार करणाऱ्या अॅपलने त्यांचे फ्लॅगशिप डिव्हाइस iPhone 11 ची भारतात निर्मिती सुरू कऱण्यात आली आहे. अॅपलने या आयफोनची निर्मिती तामिळनाडुतील चेन्नई इथं Foxconn प्लॅन्टमध्ये सुरू केली. अॅपलने पहिल्यांदाच त्यांच्या टॉप मॉडेल आयफोनची निर्मिती भारतात करण्यास सुरुवात केली आहे. 

अॅपलच्या या पावलामुळे देशातील वाढत्या लोकलायझेशनकडे लक्ष वेधलं जात आहे. सरकारच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह अंतर्गत फायदा कंपनी घेण्याचा प्रयत्न करत आहे. एका एक्झिक्युटीव्हने सांगितलं की, अॅपलच्या या निर्णयामुळे कंपनीला चीनच्या बाहेरही त्यांचे प्रॉडक्शन बेस वाढवण्यात मदत होईल.

हे वाचा - भारतीयांनी दाखवला इंगा; चिनी मोबाईल ब्रँडंना मोठे नुकसान

वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली. गोयल म्हणाले की, मेक इन इंडियासाठी महत्वाचा बूस्ट! अॅपने भारतात आयफोन 11 च्या निर्मितीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच ही कंपनी टॉप ऑफ द लाइन मॉडेल भारतात आणत आहे. 

याआधी अॅपलने 2019 साली iPhone XR च्या अॅसेंबलिंगला भारतात सुरुवात केली होती. 2017 मध्ये अॅपलनं  iPhone SE 2016 ची निर्मिती बेंगळुरूत सुरु केली होती. आता कंपनी iPhone SE 2020 चे मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या तयारीत आहे. बेंगळुरूतील Wistron मध्ये हा फोन तयार केला जाण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - गाडीवर मागे बसणाऱ्यासाठी होणार बदल, सरकारचा नवा आदेश

अॅपलची मुख्य सप्लायर कंपनी Foxconn ने भारतात त्यांच्या फॅक्टरीचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूकीची घोषणा केली होती. तसंच अॅपलची दुसरी कंपनी Pegatron सुद्धा भारतात गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे. Pegatron भारतात लोकल सब्सिडिअरीसुद्धा उघडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

मार्केट रिसर्चर आयडीसी इंडियानुसार, जानेवारी - मार्च तिमाहीमध्ये भारतात प्रिमियम सेगमेंटमध्ये अॅपल आघाडीवर होते. त्यानंतर सॅमसंग आणि वनप्लसचा नंबर लागतो. जून तिमाहीची आकडेवारी अद्याप आलेली नाही. रिसर्चरचे म्हणणे आहे की, मार्च तिमाहीमध्ये 700 ते 1000 डॉलरच्या सेगमेंटमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये आयफोन 11 चा वाटा 68 टक्के इतका होता. तर दुसऱ्या बाजुला इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये शाओमी कंपनी सर्वात पुढे राहिली. 



from News Story Feeds https://ift.tt/3hrKs4a

Comments

clue frame