Instagram ठेवतंय तुमच्यावर नजर? कंपनी म्हणते बग आहे

नवी दिल्ली - Apple च्या युजर्ससाठी नवं iOS 14 बीटा व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. या व्हर्जनमुळे सिस्टिम आणि अ‍ॅपमधील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी मदत होत आहे. युजर्सना त्यांची माहिती एखाद्या अ‍ॅपमधून चोरली जात असेल तर त्याचं नोटिफिकेशन देते. या फीचरने लिंक्डइन, रेडिट, टिकटॉकसह इतर अनेक अ‍ॅपमधील त्रुटी समोर आणल्या होत्या. युजर्सच्या क्लिपबोर्डवरून माहिती वाचल्याचा आरोप या अ‍ॅपवर होता. आता याच फीचरने इन्स्टाग्राम अ‍ॅपबाबतही नोटिफिकेशन पाठवलं आहे. अनेक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, इन्स्टाग्राम अ‍ॅपचा वापर करताना कॅमेरा आपोआप सुरू होतो.

रिपोर्टनुसार अनेक iOS 14 Beta चा वापर करणाऱ्या अ‍ॅपल युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली आहे. युजर्सनी म्हटलं की, जेव्हा ते इन्स्टाग्राम ओपन करतात तसंच जेव्हा फीड वाचत असतात तेव्हाही कॅमेरा ऑन असल्याचं दिसतं. म्हणजेच तुम्ही इन्स्टाग्राम अ‍ॅपवर व्हिडिओ किंवा फोटो क्लिक करत नसेल तरीही कॅमेरा ऑन होतो.

हे वाचा - भारतात iPhone 11 च्या निर्मितीमुळे चीनला बसणार दणका

इन्स्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचं असून याच्या iOS अ‍ॅपमध्ये गेल्या वर्षीसुद्धा असाच प्रकार झाल्याचं समोर आलं होतं. द व्हर्जला दिलेल्या मुलाखतीत इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी ही त्रुटी म्हणजे एक बग असल्याचं म्हटलं आहे. कंपनी हा बघ फिक्स करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच आम्ही कॅमेरा तेव्हाच वापरतो जेव्हा तो वापरण्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. जर तुम्ही फीडवरून कॅमेरा स्वाइप करता तेव्हा तो वापरला जातो. iOS 14 बीटामध्ये कॅमेऱ्याचा वापर होण्याचे इंडिकेटर दिसत असल्याची समस्या समोर आली आहे.

हे वाचा - भारतीयांनी दाखवला इंगा; चिनी मोबाईल ब्रँडंना मोठे नुकसान

iOS 14 च्या नव्या फीचरमुळे इतरही अनेक अ‍ॅप्समधील अडचणी समोर आल्या आहेत. यामध्ये अनेक अ‍ॅप्स युजर्सचा डेटा चोरी करत होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच संशोधकांनी 50 अ‍ॅप्सची लिस्ट प्रसिद्ध केली होती. ज्यामधून अ‍ॅपल युजर्सचा क्लिपबोर्ड अ‍ॅक्सेस केला जात होता.

Edited By - Suraj Yadav



from News Story Feeds https://ift.tt/3g68sd0

Comments

clue frame