नवी दिल्लीः रियलमीने नुकताच भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme C11 लाँच केला आहे. २२ जुलै रोजी या फोनचा पहिला सेर आयोजित करण्यात आला होता. ७ हजार ४९९ रुपये किंमत असलेल्या या फोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २ मिनिटात या फोनची १.५ लाख विक्री झाली आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच आणि दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहे. वाचाः या स्मार्टफोनचा सेल दुपारी १२ वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाची वेबसाइटवर सुरू झाला होता. अवघ्या दोन मिनिटात १.५ लाख फोनची विक्री झाली. ही आकडेवारी कंपनीने एका ट्विटद्वारे दिली आहे. आता या फोनचा पुढचा सेल २९ जुलै रोजी होणार आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये या स्मार्टफोनचा फक्त एकच व्हेरियंट येतो. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच आहे. फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. फोनची किंमत कमी असली तरी यात युजर्संना मोठा डिस्प्ले आणि मोठी बॅटरी मिळते. रियलमी सी ११ मध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनला पॉवर देण्यासाठी मीडीयाटेक हीलियो G35 प्रोसेसर दिला आहे. यात दिली आहे. रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर आणि एक फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनच्या मागे १३ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. यात दोन सीमकार्ड सोबत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येतो. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर नसला तरी फेस अनलॉकचे फीचर देण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OQunZw
Comments
Post a Comment