BSNLने आणले स्वस्तातील दोन नवे प्लान, ७० जीबी पर्यंत डेटा

नवी दिल्लीः करोना व्हायरसचे संकट असल्याने अनेक जण वर्फ फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे युजर्संना खूप मोठा डेटा लागत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन वर्क फ्रॉम होम प्लान () आणले आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना ७० जीबी डेटा ची सुविधा मिळणार आहे. कंपनीने या ऑफरला आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केले आहे. परंतु, सध्या हे प्लान चेन्नई सर्कलमध्ये लागू केले आहे. बाकीच्या ठिकाणी सुद्धा लवकरच हे प्लान आणले जातील, अशी शक्यता आहे. वाचाः BSNLचे नवीन वर्क फ्रॉम होम व्हाऊचर्स कंपनीने जे दोन नवीन वर्क फ्रॉम होम डेटा व्हाऊचर्स लाँच केले आहे. त्याची किंमत १५१ रुपये आणि २५१ रुपये आहे. १५१ रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये ग्राहकांना ४० जीबी इंटरनेट डेटा मिळण्याची सुविधा आहे. यात ३० दिवसांची वैधता दिली जाते. याप्रमाणे २५१ रुपयांच्या व्हाऊचरमध्ये ग्राहकांना ७० जीबी इंटरनेट डेटाची सुविधा मिळते. या प्लानमध्ये सुद्धा ३० दिवसांची वैधता मिळते. हे दोन्ही वर्क फ्रॉम होम प्लान आहेत. यात केवळ डेटाची सुविधा आहे. कॉलिंगची सुविधा मिळत नाही. वाचाः जिओ, एअरटेल आणि वोडाफोनचे प्लान या प्रकारे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन मध्ये आपल्या युजर्संना २५१ रुपयांचे प्लान ऑफर करीत आहे. या तिन्ही कंपन्यांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ५० जीबी डेटा दिला जातो. जिओच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. वोडाफोनच्या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. तर एअरटेलच्या प्लानची वैधता सुद्धा ३० दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZT6hne

Comments

clue frame