BSNL: जबरदस्त प्लान, रोज २२ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः यूजर्स साठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या नवीन BSNL 22GB CUL ब्रॉडबँड प्लानमध्ये दररोज २२ जीबी डेटा ऑफर करीत आहे. १२९९ रुपयांच्या किंमतीच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. बीएसएनएलने या प्लानला १ जुलै २०२० ला लाँच केले होते. प्लानमध्ये 10Mbps पर्यंत स्पीड सोबत युजर्संना रोज २२ जीबी डेटा मिळत आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 2Mbps होते. वाचाः सर्व सर्कलमध्ये प्लान उपलब्ध अंदमान आणि निकोबारला सोडून बीएसएनएलचा हा प्लान सर्व सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लानला निवडण्यासाठी युजर्संना चार ऑप्शन मिळतात. पहिला ऑप्शन म्हणजे यासाठी युजर्संना दर महिन्याला १२९९ रुपये द्यावे लागतील. दुसरा ऑप्शन म्हणजे याचा वार्षिक सब्सक्रिप्शन आहे. प्लानच्या वार्षिक सब्सक्रिप्शनसाठी १२ हजार ९९० रुपये द्यावे लागतील. दर महिन्याला रेंटलने तुलना केल्यास याची रक्कम २५९८ रुपये होते. वाचाः तीन वर्षापर्यंत करू शकतात सब्सक्राईब बीएसएनएलच्या या प्लानमध्ये तीन वर्षापर्यंत अडवॉन्स पेमेंट देऊन सब्सक्राईब केले जावू शकते. दोन वर्षासाठी युजर्सला २४ हजार ६८१ रुपये आणि तीन वर्षासाठी युजर्संना ३६ हजार ३७३ रुपये द्यावे लागतील. वाचाः खरेदी करू शकतात आयपी अॅड्रेस प्लानसोबत युजर्सला एक ईमेल अॅड्रेस सोबत १ जीबी फ्री क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. तसेच युजर्सला जर २ हजार रुपये देऊन एक स्टेटिक आयपी अॅड्रेस खरेदी करू शकतो. यासाठी एक महिन्याचे रेंज सिक्योरिटी द्यावे लागेल. प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगची ऑफर देत आहे. यासाठी कनेक्शनसोबत एक लँडलाइन फोन सुद्धा देण्यात येत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CnMiV3

Comments

clue frame