पुणे - फेसबुक सतत काही ना काही नवीन फीचर्स देत असते. आताही सगळीकडे चर्चा सुरु आहे ते नव्या रुम्स या फीचरची. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर व्हिडिओ कॉलिंग अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यातच फेसबुकने मेसेंजर रूम्स नावाने एक व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी फीचर तयार केलं आहे. मेसेंजर रुम्स आधीच आलं होतं पण एकसारखं नाव असल्यानं संभ्रम होता. त्याशिवाय कंपनीने याची चाचणीही घेतली आणि त्यानंतर सर्वांसाठी हे उपलब्ध केलं आहे.
झूम, मायक्रोसॉफ्ट टीम आणि गूगल मीटसारखंच मेसेंजर रूम्स हा एक व्हिडिओ कॉलिंगसाठीचा प्लॅटफॉर्म आहे. यातून तुमच्या संपर्कातील लोकांशी थेट बोलू शकता. गूगल मीटमध्ये मिटिंग जॉइन करण्यासाठी जसं गूगल अकाउंट लागतं तसंच मेसेंजर रूम्ससाठी फेसबुक अकाउंट गरजेचं आहे. मेसेंजर रुम्स हे वेगळं अॅप नाही. फेसबुक आणि मेसेंजरमधीलच एक फीचर आहे. कॉम्प्युटरवरसुद्धा याचा वापर करता येतो. अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सना याचा वापर करता येतो.
हे वाचा - सिम कार्डबाबत दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय
तुम्ही फेसबुक कॉम्प्युटरवर वापरत असाल तर न्यूज फीडमध्ये सर्वात वरच्या बाजूला रूम्स नावाचे बटन दिसेल. त्यात क्रिएट पर्याय निवडल्यानंतर एक लहान विंडो ओपन होईल. त्यात सुरुवातील तुम्हाला रूमची थीम सिलेक्ट करावी लागते. तुम्ही कोणत्या कारणासाठी व्हिडिओ कॉल करणार आहात त्यानुसार रूमच्या थीमची निवड करता येते. त्यानंतर यामध्ये कोणाकोणाला जॉइन करता येईल ते सिलेक्ट करता येतं. त्यानंतर रूम स्टार्ट होण्याचं टायमिंग सेट करता येते.
रूम तयार झाल्यानंतर मित्रांना त्यांच्या न्यूज फीडमध्ये वरच्या बाजुला दिसेल. रूम तयार केल्यानंतर त्याची एक लिंकही मिळेल. ही लिंक सर्वांना पाठवता येते. जोपर्यंत तुम्ही रूम ओपन करत नाही तोपर्यंत इतरांनाही त्यात सहभागी होता येत नाही. एखाद्याने लिंक ओपन करून रूम जॉइन करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला त्यासाठी रिक्वेस्ट येते. ती अॅक्सेप्ट केल्यानंतर तुम्हीसुद्धा रूम जॉइन करता.
हे वाचा - महागड्या स्मार्टफोनची अनुभूती देणारा 'परवडेबल' OnePlus Nord लॉन्च; कधी अन् कितीला मिळणार?
मिटिंग सुरू झाल्यानंतर रूम कोणी कोणी जॉइन केली आहे हे तुम्ही पाहू शकता. तसंच रूम लॉकही करता येते. लॉक केल्यानंतर इतर कोणाला ती जॉइन करता येत नाही. रूम ऑफ करण्यासाठी एंड रूमचा पर्याय दिला जातो.
मेसेंजरच्या विंडोमध्ये सर्च बटनच्या शेजारी रूम्सचं बटन असतं. इतर प्रोसेस न करता इन्स्टंट रूमसाठी हा ऑप्शन आहे. मेसेंजरमधून रूम तयार करण्यासाठी सेम स्टेप्स आहेत. मेसेंजर अॅपमध्ये जिथं फ्रेंड्सची लिस्ट दिसते तिथंच रूमचे बटन असते. ते सिलेक्ट केल्यानंतर रूममध्ये कोणाला जॉइन करायचं त्याची यादी तयार करावी लागते. त्यानंतर रूमचा वापर करता येतो.
from News Story Feeds https://ift.tt/39pvoBa
Comments
Post a Comment