चायनीज अॅपवर बंदी घातल्याने 'यांना' झाला मोठा फायदा

नवी दिल्लीः टिकटॉक () आणि हेलो सारख्या चायनीज अॅप्सवर बंदी घातल्यानंतर त्याचा काही कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. केंद्र सरकारने चायनीज संबंधित ५९ अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. या बंदीमुळे फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम यासारख्या अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला खूप मोठा फायदा झाला आहे. ३० जून रोजी केंद्र सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या बंदी नंतर इंस्टाग्रामवर रोज घालवण्यात येत असलेल्या वेळात २.३ पट अधिक वाढ झाली आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकलाही याचा मोठा फायदा झाला आहे. वाचाः इंडियन युजर्स दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर सोशल मीडिया आणि व्हिडिओ अॅप्सवर भारतीयांकडून खर्च करण्यात येत असलेल्या वेळेत घसरण झाली नाही. यावरुन असा अंदाज बांधाला जात आहे की, या युजर्संनी नवीन प्लॅटफॉर्म शोधला आहे. ऑनलाइन इनसाइट्स मेशरमेंट कंपनी Kantar च्या एका स्टडीत म्हटले आहे की, Kantar चे वेब ऑडियंस मेशरमेंट (WAM) पॅनलवर दिसतेय की, टिकटॉक सारख्या चायनीज अॅपची प्रसिद्धी आणि वेगवान ग्रोथ मुळे अमेरिकेच्या इंटरनेट कंपन्यांना बाजार भागीदारीत जे नुकसान झाले होते. ते आता त्यांना भरून मिळाले आहे. त्यांनी ते वसूल केले आहे. वाचाः ऑनलाइनवरील वेळात फक्त ६ टक्के घट एनालिसिसच्या माहितीनुसार, युजर्स चायनीज प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला काही तास घालवत होते. ऑनलाइन वेळ घालवणाऱ्यांच्या संख्येत घट होईल, अशी आशा होती. परंतु, केवळ ६ टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. आधी ६ तास ३७ मिनिट होते. आता ६ तास १५ मिनिट आहे. यावरून संकेत मिळत आहेत की, युजर्संनी दुसरीकडे आपला मोर्चा वळवला आहे. याचा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फायदा झाला आहे. वाचाः इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूबला फायदा इंस्टाग्रामवर दररोज घालवण्यात येत असलेला वेळ १६ मिनिट होता. आता तो ३७ मिनिटावर पोहोचला आहे. फेसबुकवरील टाईम ३० मिनिटांऐवजी ४० मिनिटे झाला आहे. स्टडीच्या माहितीनुसार, व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर यूट्यूबचा दबदबा कायम दिसत आहे. याच्या स्थितीत आणखी सुधारणा झाली आहे. Kantar च्या एनालिसिसच्या माहितीनुसार, देशात सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर घालवण्यात येत असलेला वेळ २५ टक्क्यांनी वाढला आहे. यूट्यूबवर आधी ५७ मिनिटे वेळ घालवला जात होता. तो आता ७० मिनिटांपर्यंत पोहोचला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hpWmvB

Comments

clue frame