सॅमसंगचा जबरदस्त फोन आज होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंग आज आपला प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. दुपारी १२ वाजता या एका कार्यक्रमात या फोनला लाँच करण्यात येणार आहे. गॅलेक्सी Galaxy M31s ची टक्कर मार्केटमधील वनप्लस नॉर्ड, रियलमी एक्स३, आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स यासारख्या स्मार्टफोन्ससोबत होईल. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोनची किंमत २० हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. फोनचा पहिला सेल ६ आणि ७ ऑगस्ट रोजी अॅमेझॉनवर होणार आहे. वाचाः जबरदस्त फीचर्ससोबत होणार लाँच सॅमसंगचा हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये अनेक फीचर्ससोबत एन्ट्री करणारा आहे. कंपनीने अॅमेझॉनवर या फोनची एक मायक्रो वेबसाइट लाइव्ह केली आहे. या मायक्रोसाइट मध्ये फोनचे काही वैशिष्ट्ये दाखवले आहेत. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh बॅटरी दिली आहे. फोन २५ वॉट फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः ८ जीबी रॅम आणि Exynos प्रोसेसर सॅमसंग गॅलेक्सी M31s मध्ये मोठा सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो फुल एचडी रिझॉल्यूशन सोबत येईल. डिस्प्लेच्या टॉप सेंटरमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होल डिस्प्ले दिला आहे. फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येईल. या फोनचा एक ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हेरियंट सुद्धा कंपनी लाँच करू शकते. सॅमसंग या फोनमध्ये Exynos 9611 चिपसेट देण्याची शक्यता आहे. जबरदस्त कॅमेरा सेटअप कंपनी या फोनच्या कॅमेरा फीचर्सला खूप प्रमोट करीत आहे. यात तुम्हाला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्ससोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा अँगल सेन्सर, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gb8LTW

Comments

clue frame