४ हजारांनी स्वस्त झाला ६ कॅमेऱ्याचा विवो स्मार्टफोन

नवी दिल्लीः विवोचा जबरदस्त स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. फोनच्या किंमतीत कंपनीने ४ हजार रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत २७ हजार ९९० रुपयांऐवजी आता २४ हजार ९९० रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता २७ हजार ९९० रुपये झाली आहे. किंमत कपाती आधी या फोनची किंमत ३१ हजार ९९० रुपये होती. वाचाः ट्विटरवरून दिली माहिती विवो V19 च्या किंमतीत कपात करण्यात आल्याची माहिती महेश टेलिकॉमने दिली आहे. महेश टेलिकॉमने आपल्या ट्विटर हँडलवरून विवो व्ही१९ च्या पोस्टरसोबत जुन्या आणि नवीन किंमतीची माहिती सांगितली आहे. शेयर केलेल्या पोस्टरनुसार, फोनला १० टक्के कॅशबॅक सोबत खरेदी केले जावू शकते. तसेच या फोनच्या खरेदीला जिओ युजर्सला १० हजार रुपयांचे बेनिफिट्स दिले जात आहे. विवो V19 चे फीचर मिस्टिक ब्लू आणि प्यानो ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन दिला आहे. या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा एक ड्यूल नॅनो सिम सपोर्ट करणारा फोन आहे. यात डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर दिले आहे. वाचाः ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज ऑप्शनच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 712एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. यासोबत 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X8pTC2

Comments

clue frame