नवी दिल्लीः शाओमीने आपल्या रेडमी K20 सीरीज आणि Mi 9 सीरीज च्या स्मार्टफोनसाठी MIUI 12 अपडेट जारी केले आहे. पहिल्या फेजचे अपडेट पूर्ण झाल्यानंतर आता MIUI 12च्या स्टेबल व्हर्जनला शाओमी, रेडमी, आणि पोको च्या अनेक अन्य मॉडल्ससाठी जारी करण्यात येईल. अपडेटचे दुसरे फेज ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल. वाचाः Piunika Web च्या रिपोर्टच्या माहितीनुसार, हे अपडेट कोणत्या मॉडल्सला मिळणार आहे. त्याची पूर्ण यादी कंपनीच्या इंडोनेशियन वेबसाईटवर देण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, शाओमीच्या इंडोनेशियन युजर्सला पुढील महिन्यापासून हे अपडेट मिळेल. भारतीय युजर्संना हे अपडेट कधीपासून मिळणार आहे, याची माहिती अद्याप जारी करण्यात आली नाही. भारतात सध्या रेडमी K20 आणि रेडमी K20 प्रो यासारख्या स्मार्टफोन्सला MIUI 12 चे बीटा व्हर्जन ऑफर केले जात आहे. वाचाः या स्मार्टफोन्सला मिळणार नवीन अपडेट रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनीच्या Mi 10, Mi नोट 10, Mi नोट 10 Pro, Mi 8 Lite, पोको F2 Pro, पोकोफोन F1, रेडमी नोट 9, रेडमी नोट 9 Pro, रेडमी नोट 8 Pro, रेडमी नोट 8, रेडमी नोट 7, रेडमी नोट 6 Pro, रेडमी नोट 5, रेडमी 9, रेडमी 8, रेडमी 8A, रेडमी 8A Pro, रेडमी 7, रेडमी 7A, रेडमी 6A, रेडमी 6, रेडमी 6 Pro, रेडमी S2 स्मार्टफोन्सला हे अपडेट मिळणार आहे. वाचाः MIUI 12 मुळे बदलणार लूक या अपडेटने शाओमीच्या फोनचा युजर इंटरफेस बदलेल. नवीन MIUI 12 मध्ये युजर्संना कॅमेऱ्यात नवीन फीचर्स आणि इंप्रूवमेंट्स पाहायला मिळतील. तसेच मल्टीटास्किंग फीचर्स आणि एनिमेटेड आयकॉन्स दिले जातील. अपडेट नंतर फोनमध्ये सुपर वॉलपेपर, परमिशन प्रिवेसी फीचर्स, स्लीप ट्रॅकिंग, यूनिवर्सल डार्क मोड आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले कस्टमाइजेशन यासारखे फीचर्स मिळतील. यात हवामान आणि बॅटरीसाठी एक नवीन अॅप मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eQUgTA
Comments
Post a Comment