"झूम'ला "जिओ मीट'ची टक्कर 

सध्याच्या इंटरनेट युगात व्हिडिओ कॉलिंगचे महत्त्व वाढले आहे. लॉकडाउनमुळे जास्तीत जास्त लोक घराबाहेर न पडता घरूनच ऑफिसचे काम करत आहेत. अशा वेळी व्हॉईस कॉलपेक्षा व्हिडिओ कॉलिंगला महत्त्व आले आहे. आता कडक टाळेबंदी शिथिल होऊन अनलॉकला सुरुवात झाली असली, तरीही एकंदर परिस्थिती पाहून अनेकजण घरीच राहून काम करणे पसंत करत आहेत. अनेक कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा दिली आहे. अशा परिस्थितीत आपले मित्र आणि घरच्यांशी संपर्कात राहण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग हा उत्तम पर्याय असून, सध्या तो निवडण्याकडे सर्वांचा कल आहे. अशा वेळी "जिओ मीट' नावाचे ऍप बाजारात आले असून, ते झूम ऍपला टक्कर देत आहे. हे ऍप वापरायला सोपे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

"रिलायन्स जिओ'ने काही दिवसांपूर्वी "जिओ मीट' (JioMeet) हे ऍप लॉन्च केले. हे ऍप "गुगल प्ले स्टोअर' आणि "ऍप स्टोअर"मध्ये उपलब्ध आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप "झूम'ला हे ऍप पर्याय ठरत आहे. सुमारे एक महिन्यापासून हे ऍप काही यूजर्सना बिटा फॉर्ममध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र आता सर्वांसाठीच हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ऍप मोफत असून, यूजर्स एका दिवसात कितीही मीटिंग करू शकतात. शिवाय या मीटिंग पासवर्ड- प्रोटेक्‍टेड असणार आहेत. यामध्ये वेटिंग रूमचीही सुविधा आहे. "क्रोम', "फायरफॉक्‍स'सह हे ऍप विंडो, मॅक, आयओएस आणि अँड्रॉईडवरही डाउनलोड करण्याची सुविधा आहे. 

या ऍपला सोप्या पद्धतीने इंटरफेस देण्यात आला असून, यात पाच डिव्हाइसपर्यंत मल्टी-डिव्हाइस लॉगइन सपोर्ट देण्यात आला आहे. कॉल चालू असताना यूजर्स डिव्हाइस सहज बदलता येतो. तसेच, यात स्क्रीन शेअरिंगचेही फिचर आहे. या ऍपमध्ये मीटिंग निश्‍चित करण्यापासून, स्क्रीन शेअर करण्यासारखी अनेक फीचर्स आहेत. तसेच, अडचणी सोडविण्यासाठी या ऍपमध्ये प्रश्नही विचारता येतात. तुम्ही प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येते. यातून तुमच्या ऍपबाबतच्या काही अडचणी असल्यास त्या तत्काळ दूर होतात. तसेच, या ऍपमध्ये आपल्या संपर्क यादीत असलेल्या लोकांना आपण आमंत्रितही करू शकतो. या ऍपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाही. डेस्कटॉपवरून काम करणारे युजर्स "गुगल क्रोम' आणि "मोझिला फायरफॉक्‍स'च्या ब्राउझरवरूनही "जिओ मीट'चा वापर करू शकतात. "जिओ मीट'चे सर्व अधिकार हे "जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड'कडे राखून ठेवण्यात आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऍपमधील महत्त्वाच्या सुविधा 
1) हे ऍप एचडी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी सपोर्ट करते. 
2) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एकावेळी 100 लोकांना सहभागी होता येते. 
3) मीटिंगची वेळ आणि तारीख ठरवून शेड्यूल करता येते. 
4) अडचणी सोडविण्यासाठी प्रश्न विचारण्याची सुविधा. 
5) वेटिंग रूमचीही सुविधा उपलब्ध आहे. 

"जिओ मीट' वापराच्या पायऱ्या 
1) हे ऍप "गुगल प्ले स्टोअर'वरून डाउनलोड करावे. 
2) आपला मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीद्वारे साईन-अप करावे. 
3) मोबाईल क्रमांकावर मिळालेला "ओटीपी' योग्य ठिकाणी नमूद करावा. 
4) मिळालेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून पुढील प्रक्रिया करावी. 

"जिओ मीट'मध्ये सहभागी होण्यासाठी... 
1) मीटिंग या पर्यायावर क्‍लिक करावे. 
2) त्यानंतर स्टार्ट, सेंड इनव्हिटेशन अशा पर्यायांमधून हवा तो पर्याय निवडून मीटिंगला सुरुवात करावी. 



from News Story Feeds https://ift.tt/3jCkU6q

Comments

clue frame