स्वस्त झाले सॅमसंगचे ५ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या नवी किंमत

नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने गेल्या आठवड्यात अनेक स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. यात कंपनीच्या फोल्डेबल फोन पासून ते गॅलेक्सी आणि ए सीरीजच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. यात कंपनीचे वेगवेगळ्या रेंजमधील स्मार्टफोन्स आहेत. या स्मार्टफोनची किंमत १६ हजार रुपयांपासून १ लाख १६ हजार रुपयांपर्यंत आहे. वाचाः Galaxy Z Flip च्या किंमतीत ७ हजारांची कपात सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत ७ हजार रुपयांनी कमी केली आहे. फोनची किंमत आधी १ लाख १५ हजार ९९९ रुपये होती. ता आता १ लाख ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात दोन डिस्प्ले दिले आहे. प्रायमरी डिस्प्ले ६.७ इंचाचा आहे आणि सेकंडरी डिस्प्ले १.१० इंचाचा आहे. यात 12MP + 12MP चा रियर कॅमेरा सेटअप आणि १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः गॅलेक्सी Note 10 Lite ४ हजारांनी स्वस्त सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइटची किंमत ४ हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. या कपातीनंतर ६ जीबी रॅम मॉडलची किंमत ३७ हजार ९९९ रुपये, आणि ८ जीबी रॅमच्या मॉडलची किंमत ४३ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले 12MP + 12MP + 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा, 32MP चा फ्रंट कॅमेरा आणि 4,500mAh बॅटरी दिली आहे. गॅलेक्सी ए सीरीजचे तीन फोन स्वस्त कंपनीने याशिवाय गॅलेक्सी A51, गॅलेक्सी A31 आणि गॅलेक्सी A21s स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए५१ च्या टॉप व्हेरियंटची किंमत १ हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आली आहे. आता या ८ जीबी रॅम मॉडलची किंमत २६ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः तर गॅलेक्सी ए३१ च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. हा फोन एकाच व्हेरियंट (6GB + 128GB) मध्ये येतो. या फोनला आता २० हजार ९९९ रुपयांत खरेदी केले जावू शकते. तसेच सॅमसंग गॅलेक्सी ए२१ एस च्या ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५०० रुपये कमी करण्यात आली आहे. तसेच टॉप मॉडलची (6GB + 64GB) च्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jNbN2N

Comments

clue frame