एअरटेल युजर्संना झटका, आधीसारखा नाही मिळणार डिस्काउंट

नवी दिल्लीः टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलकडून एप्रिलमध्ये लाँच करण्यात आलेल्या सुपर हिरो प्रोग्राम मध्ये बदल केला आहे. एअरटेलच्या या सर्विस अंतर्गत युजर्संना बेनिफिट्स मिळत होते. जे दुसऱ्या एअरटेल युजर्सचे अकाउंट रिचार्ज करीत होते. आता पर्यंत या प्रमाणे करीत असलेल्या रिचार्जवर ४ टक्के डिस्काउंट मिळत होता. वन्ली टेक च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, एअरटेलने या डिस्काउंटमध्ये बदल केला आहे. वाचाः आधी मिळत असलेले ४ टक्के डिस्काउंटला आता कमी केले आहे. तसेच अनेक प्लान विना डिस्काउंट कूपन शिवाय ऑफर केले जात आहे. सुपरहिरो प्रोग्रामला खास करुन करोना संसर्ग काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान घोषित केले होते. याच्या मदतीने सब्सक्रायबर्सला आपसात कनेक्टेड राहण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले होते. नवीन अपडेटच्या माहितीनुसार, एयरटेलने या प्रोग्रामध्ये इनरोल झालेल्या युजर्संसाठी डिस्काउंट बेनिफिट्स ४ टक्के कमी करुन ते २ टक्के केले आहे. वाचाः स्वस्त प्लानवर बेनिफिट्स कमी एअरटेलच्या ज्या प्लान्समध्ये आधीच्या तुलनेत कमी बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यात ९९ रुपये, १२९ रुपयांच्या प्रीपेड प्लानचा समावेश आहे. तसेच १९ रुपये, २० रुपयांच्या किंमतीचे प्लानवर आता कोणताही डिस्काउंट मिळणार नाही. याआधी एअरटेल १८ रुपये आणि १९ रुपये या प्लानवर १ रुपयांचा डिस्काउंट मिळत होता. आता ४५ रुपये आणि ४९ रुपये या प्लानवर रिचार्ज केल्यास १ रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. आधी हा प्लान २ रुपयांचा डिस्काउंट ऑफर करीत होता. वाचाः या प्लान्सवर डिस्काउंट नाही लेटेस्ट २८९ रुपयांच्या प्रीपेड प्लानला आता या प्रोग्रामवरून हटवले आहे. हा विना कोणत्याही डिस्काउंट कूपन शिवाय येतो. टॉकटाईमच्या चार पॅक्सवर सुद्धा चार टक्क्यांऐवजी दोन टक्के करण्यात आले आहे. या रेंजमध्ये ५ हजार रुपयांपासून १०० रुपये किंमतीच्या पॅकचा समावेश आहे. २० रुपये आणि १० रुपये किंमतीच्या पॅक्सवर आता कोणताही डिस्काउंट नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gbPe5A

Comments

clue frame