ऑनलाइन पेमेंट करताना 'या' चुका करु नका, सरकारचा इशारा

नवी दिल्लीः करोना संकट देशात सुरू आहे. करोनामुळे अनेक लोक घरात बसून आहेत. त्यामुळे ऑनलाइनचा व्यवहार वाढला आहे. त्यामुळे हॅकर्स याचाच गैरफायदा घेताना दिसत आहे. सर्वसामान्य व्यक्तींच्या ऑनलाइन अज्ञानाचा फायदा घेत आहेत. हे सर्व लक्षात घेऊन सरकारने एक यादी तयार केली आहे. या यादीतून सरकारने सर्वसामान्य लोकांना सांगितले आहे की, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. वाचाः या चुका करु नका >> कोणत्याही व्यक्तीसोबत आपला अकाउंट पासवर्ड शेअर करु नका. कोणत्याही अज्ञात लिंक किंवा अटॅचमेंटला ओपन करु नका. >> ऑनलाइन बँकिंगचा वापर केल्यानंतर त्याचे लॉगइन तसेच ठेवू नका. नेहमी लॉगआउट जरुर करा. >> आपली पर्सनल यूएसबी किंवा हार्ड डिस्कचा वापर कोणत्याही अन्य दुसऱ्या लॅपटॉप किंवा कम्प्यूटरवरून करु नका. >> सोशल मीडियावर कधीही आपली जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर यासारखी माहिती उघड करु नका. यावरून होऊ शकतो. वाचाः हेही लक्षात असू द्या >> आपल्या अकाउंटचा पासवर्ड नेहमी अवघड ठेवा. कोणालाही लवकर अंदाज बांधता येवू नये. वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा. >> कोणत्याही अॅप किंवा वेबसाइटचा वापर करताना प्रायव्हसी सेटिंग्सला लक्षपूर्वक वाचा. >> जर कधीही अकाउंट हॅक होण्याचा संशय आला तर तात्काळ याची माहिती सपोर्ट टीमला द्या. >> आपल्या सिस्टमला वेळोवेळी अपडेट करीत राहा. चांगल्या अँटिव्हायरसचा वापर करा. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hgURiY

Comments

clue frame