वनप्लसने आणले स्वस्त इयरबड्स, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्व डिटेल्स

नवी दिल्लीः OnePlus ने अधिकृतपणे लाँच केले आहेत. हे कंपनीचे पहिले ट्रू वायरलेस इयरबड्स आहेत. कंपनीने आपल्या मिड रेंज फोन OnePlus Nord च्या लाँचिंग कार्यक्रमात हे नवीन इयरबड्स लाँच केले आहेत. या नवीन इयरबड्सची चर्चा आधीपासूनच सुरू होती. तसेच याची डिझाईन आणि फीचर्स संबंधित नवीन लिक्स आधीच समोर आली होती. भारतात वनप्लसच्या न्यू इयरबड्सची किंमत ४ हजार ९९० रुपये आहे. ही किंमत वनप्लसच्या इयरबड्सच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त प्रोडक्टमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. वाचाः इयरबड्समध्ये हे फीचर्स नाहीत वनप्लसने आपल्या इयरबड्स स्वस्त किंमतीत लाँच केले आहेत. या इयरबड्समध्ये अनेक फीचर्स देण्यात आले नाहीत जे प्रीमियम इयरबड्समध्ये मिळतात. या इयरबड्स मध्ये नॉइज कँसलेशन, सिलिकॉन इयर टिप्स, वायरलेस चार्जिंग यासारखे फीचर्स देण्यात आले नाहीत. वाचाः जबरदस्त पॉवर बॅकअप मिळणार वनप्लसच्या या इयरबड्समध्ये जबरदस्त पॉवर बॅकअप मिळणार आहे. वनप्लसचे इयर बड्स ७ तासांच्या ऑडिओ प्लेबॅक टाइमसोबत येतात. चार्जिंग च्या अतिरिक्त बॅटरी मिळून हे ३० तासांपर्यंत पॉवर बॅकअप देते. वाचाः ८० मिनिटात फुल चार्ज वनप्लस एयरबड्स ८० मिनिटात फुल चार्ज केले जावू शकते. कंपनीचा दावा आहे की, १० मिनिटाच्या चार्जिंगमध्ये तुम्हाला १० तासांचा प्ले बॅक मिळेल. इयरबड्स मध्ये जबरदस्त ऑडियो आऊटपूट साठी डॉल्बी एटमॉस सपोर्ट दिला आहे. इयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टेंस सोबत येतो. हे इयरबड्स व्हाईट, ग्रे आणि नॉर्ड ब्लू या तीन रंगात उपलब्ध आहेत. वाचाः वनप्लस नॉर्ड झाला लाँच कंपनीने आपल्या AR लॉन्चिंग मध्ये सर्वात स्वस्त वनप्लस नॉर्ड सुद्धा लाँच केला आहे. भारतात या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन अॅमेझॉन इंडियावर ४ ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WDuGeA

Comments

clue frame