दिल्ली : एक नवीन टेक्नोलॉजी आली आहे , जिच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांच्या आत फोन फुल चार्ज होणार. फेमस कंपनी क्वालकॉम (Qualcomm) ने वनप्लसच्या स्मार्टफोन प्रोसेसर बनवण्यासाठी नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी ''Quick Charge 5'' आणली आहे.
स्मार्टफोन प्रोसेसर बनवण्यासाठी प्रसिद्ध कंपनी क्वालकॉम (Qualcomm) ने नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी Quick Charge 5 आणली आहे. या मुले तुम्हाला ५ मिनिटात स्मार्टफोनला झिरो ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येणार.
सोबतच, स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी केवळ १५ मिनिटाचा वेळ लागतो. हे अपग्रेड व्हर्जन कंपनीच्या २०१७ मध्ये आणलेल्या क्विक चार्ज 4+ टेक्नोलॉजीचे आहे. हि नवीन टेक्नोलॉजी जुन्याच्या तुलनेत चौपट अधिक आहे. सध्यातरी हे टेस्टिंग फेजमध्ये आहे. तसेच तिसऱ्या तिमाहीत फोनमध्ये ही टेक्नोलॉजी आणणार आहे.
बॅटरी फुल चार्ज १५ मिनिटात
क्विक चार्ज ५ टेक्नोलॉजी 100W जास्त चार्जिंग क्षमता आहे. जुन्या टेक्नोलॉजी ४५ वॉट पॉवर सोबत येते. हे 4000mAh ची बॅटरी चार्ज करण्यासाठी १० डिग्री पर्यंत गरम आहे. ही फर्स्ट जनरेशनची क्विक चार्ज टेक्नोलॉजीच्या १० पट अधिक पॉवरफुल आहे. ही एक साधारण बॅटरी शून्य ते १०० टक्के पर्यंत चार्ज होण्यास जास्त मिनिट वेळ लागतात. तर क्विक चार्ज ४ प्लस कडून १५ मिनिटात १०० टक्के बॅटरी चार्ज होते.
बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी यात क्वॉलकॉम बॅटरी सेव्हर आणि अपडेप्टर कॅपेबिलिटी साठी स्मार्ट आयडेंटिफिकेशन यासारखे फीचर्स मिळणार आहे. सुरुवातीला ही टेक्नोलॉजी केवळ त्या डिव्हाईसमध्ये सपोर्ट करेल. ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५, स्नॅपड्रॅगन 865+ आणि यानंतरचे येणारे प्रोसेसर असतील. येणाऱ्या काळात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७०० सीरीजच्या प्रोसेसरच्या फोनमध्ये देणार.
हेही वाचा : तुम्हाला डायबेटिस आणि डायलिसिस यामधील संबंध माहिती आहे का ?
ओप्पोने नुकताच नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी 125W Flash Charge आणली आहे. ओप्पोचा दावा आहे की, त्यांची टेक्नोलॉजीने 4000mAh ची बॅटरी केवळ २० मिनिटात चार्ज होते. तसेच रियलमी सुद्धा 125W UltraDAR फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी घेऊन येत आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
from News Story Feeds https://ift.tt/30Y71qu
Comments
Post a Comment