शाओमीचा दोन डिस्प्ले आणि ट्रान्सपॅरंट डिझाईनचा फोन

नवी दिल्लीः चीनची फोन निर्माता कंपनी एका अशा स्मार्टफोनवर काम करीत आहे. ज्यात दोन डिस्प्ले आणि ट्रान्सपॅरंट डिझाईन देण्यात आली आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन कमर्शियल व्हेरियंट असू शकतो. फोनच्या संबंधित माहिती आधीच समोर आली आहे. त्यावेळी फोनचा स्केच समोर आला होता. आता पुन्हा एकदा फोनचा पेटेंट डिझाईन लिक झाला आहे. फोनमध्ये दोन डिस्प्ले शिवाय, एआय झूम कॅमेरा असणार आहे. वाचाः शाओमीने गेल्या वर्षी मी मिक्स अल्फा (Mi Mix Alpha) आणले होते. परंतु, आत्तापर्यंत हे बाजारात उतरवले नाही. हा कंपनीचा एक कॉन्सेप्ट फोन होता. ज्यात इनोवेटिव्ह डिझाईन देण्यात आले होते. नवीन पेटेंट समोर आल्यानंतर कंपनी एमआय मिक्स अल्फाला या नवीन डिझाईनसोबत लाँच करू शकते. वाचाः युनिक आहे डिझाईन या स्मार्टफोनमध्ये एक रॅप अराउंड डिस्प्ले दिला आहे. फोनच्या दोन्ही बाजुला उपलब्ध आहे. या प्रमाणे युजर्सला फोनमध्ये पुढच्या आणि वेगवेगळे डिस्प्ले दिला जाणार आहे. समोरच्या बाजुला प्रायमरी डिस्प्ले दिला आहे. जो पूर्णपणे फ्रंट साईडला कव्हर करतो. हा डिस्प्ले फोनच्या दोन्ही बाजपर्यंत डिस्प्ले दिला आहे. मागच्या बाजुला देण्यात आलेला सेकंडरी डिस्प्ले फोनच्या अर्ध्या रियर पॅनेलला कव्हर करू शकतो. या डिस्प्लेच्या वरच्या भागात एक युनिक कॅमेरा सिस्टम देण्यात आले आहेत. वाचाः या फोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय़) झूम कॅमेरा दिला आहे. LetsGoDigital च्या रिपोर्टनुसार, यात १०८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा से्न्सर मिळू शकतो. शाओमीच्या या फोनमध्ये दोन व्हेरियंट असू शकते. एका व्हेरियंटमध्ये ट्रान्सपॅरेंट कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो. तर दुसऱ्या बाजुला कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WNis38

Comments

clue frame