मारुती सुझुकी 7 सीटर WagonR लाँच करण्याच्या तयारीत?

नवी दिल्ली - मारुती सुझुकी त्यांच्या लोकप्रिय WagonR चे 7 सीटर मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. नुकतंच चाचणीवेळी अशी एक कार दिसल्यानं 7 सीटर WagonR ची चर्चा होत आहे. मारुती सुझुकी कंपनीने अशा कारची संकल्पना 2013 मध्ये इंडोनेशियात झालेल्या एका मोटर शोमध्ये मांडली होती. यानंतर गाडीच्या या युनिक मॉडेलबाबत कोणतीच चर्चा झाली नव्हती. दरम्यान, आता गुरुग्राम- दिल्ली एक्सप्रेस वेवर एक टेस्टिंग मॉडेल पाहण्यात आलं आहे. ज्यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, मारुती सुझुकी कंपनी 7 सीटर वॅगन आर गाडी लाँच करण्याची तयारी करत आहे. 

मारुती वॅगनआरच्या तुलनेत टेस्टिंग करताना पाहण्यात आलेल्या मॉडेलची लांबी थोडी जास्त दिसत आहे. यामुळे गाडीमध्ये आणखी एक सीट मागे वाढवण्यासाठी पुरेशी स्पेस मिळेल असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार असंही सांगण्यात येतं की, 7 सीटर वॅगनआरची लांबी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा थोडी जास्त असेल मात्र ती 4 मीटरपेक्षा कमीच असेल. 

हे वाचा - आली स्वस्तातली इलेक्ट्रिक स्कूटर, धावते 110 किलोमीटर

स्टँडर्ड मारुती वॅगन आरच्या तुलनेत या नव्या वॅगनआरचं स्टायलिंग वेगळं असेल. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनचं ग्रिल, फ्रंट आणि रिअर बंपर आणि वेगळे हेडलॅम्प आणि टेललॅम्प मिळण्याची शक्यता आहे. प्लॅटफॉर्म, इंजिन ऑप्शन आणि बॉडी पॅनल्स हे सध्याच्या वॅगनआर सारखेच असतील. 

डॅशबोर्ड आणि फ्रंटसीटसह 7 सीटर कारचे इंटेरिअरसुद्धा स्टँडर्ड वॅगनआर प्रमाणेच असेल. टेस्टिंग मॉडेलमध्ये अलॉय व्हील आहेत. यामुळे 7 सीटर वॅगनआरमध्ये अलॉय व्हीलचा पर्याय असण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - नव्या जनरेशनची होंडा सिटी लाँच, भारतात पहिल्यांदाच कारमध्ये दिलंय अनोखं फीचर

रिपोर्टनुसार 7 सीटर वॅगनआर सर्वात पहिल्यांदा इंडोनेशियात लाँच केली जाण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय बाजारातसुद्धा ही कार लवकरच येऊ शकते. मारुतीच्या लाइनअपमध्ये एमपीव्ही आर्टिगानंतर याच गाडीचा नंबर असू शकतो. तसंच ही कार बाजारात आल्यास रेनॉच्या ट्रायबर सारख्या लहान एमपीव्ही गाड्यांना टक्कर देईल.



from News Story Feeds https://ift.tt/32F3Whz

Comments

clue frame