नवी दिल्लीः सध्या स्मार्टफोन कंपन्या स्वस्त किंमतीच्या ५जी स्मार्टफोवर काम करीत आहेत. दक्षिण कोरियाची कंपनी सुद्धा यात मागे नाही. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग लवकरच गॅलेक्सी स्मार्टफोन घेऊन येण्याची शक्यता आहे. हा फोन एक ५जी स्मार्टफोन असणार आहे. जो कंपनीचा सॅमसंग गॅलेक्सी A31 चे अपग्रेड मॉडल असणार आहे. यासंबंधीची माहिती पहिल्यांदा समोर आली आहे. कंपनीने नुकताच गॅलेक्सी M31s स्मार्टफोन लाँच केला आहे. २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा फोन लाँच केला आहे. वाचाः ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार GalaxyClub च्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात येणार आहे. हा कॅमेरा गॅलेक्सी ए३१ मध्ये दिला होता. प्रायमरी कॅमेऱ्यासोबत नवीन फोनमध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. जुन्या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर दिला होता. सुरूवातीला सॅमसंगने ९ नवीन स्मार्टफोनसाठी ट्रेडमार्क फाईल केले होते. यात गैलेक्सी A12,गॅलेक्सी A22, गॅलेक्सी A32, गॅलेक्सी A42, गॅलेक्सी A52, गॅलेक्सी A62, गॅलेक्सी A72, गॅलेक्सी A82 आणि गॅलेक्सी A92 यासारख्या स्मार्टफोनचा समावेश होता. वाचाः सॅमसंग गॅलेक्सीए३१ चे फीचर या फोनची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.४० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूसन 1080x2400 पिक्सल आहे. फोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि मीडियाटेक हीलियो पी६५ प्रोसेसर सोबत येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि ५-५ मेगापिक्सलचे सेन्सर दिले आहेत. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ggQp3T
Comments
Post a Comment