टिकटॉक Uninstall केलं म्हणजे झालं नाही, तुम्ही ही प्रोसेस केलीत का?

नवी दिल्ली - चीनमधून जगभरात कोरोना व्हायरस पसरला आणि यामुळे आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तसंच भारत आणि चीन सीमेवर चीनकडून कुरघोडी केली जात असल्यामुळे भारतात चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. यात ऑनलाइन अॅप्लिकेशन्स, मोबाइल आणि इतर प्रोडक्ट्सचा समावेश. सुरुवातीला टिकटॉक अॅपवरही बहिष्कार टाकत अनेक युजर्सनही अॅप अनइन्स्टॉल केले होते. पण फक्त अनइन्स्टॉल केल्यानं तुमचं अकाउंट डिलिट होत नाही ते तसंच सुरु असतं. जो पर्यंत तुम्ही तुमचं अकाउंट डिलिट करत नाही तोपर्यंत ते कंपनीच्या सर्व्हरवर अॅक्टिव राहील. 

Apple ची iPhone साठी नवी सिस्टिम, iOS 1 नंतर पहिल्यांदाच केला हा बदल

टिकटॉकला आता भारतात चिंगारी अॅप टक्कर देत आहे. हे चिंगारी अॅप गेल्या 72 तासात 5 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. चिंगारी हेसुद्धा टिकटॉकसारखंच शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग अॅप आहे. यामध्ये व्हिडिओ अपलोड आणि डाऊनलोड करता येतात. याशिवाय अॅपमधून मित्रांसोबत चॅटिंग करता येतं. याशिवाय फीडच्या माध्यमातून ब्राऊझिंगसह व्हिडिओ स्टेस्टस, ऑडिओ क्लिप्स, जीआयएफ स्टीकर्स, फोटोज एकत्र करून क्रिएटीव्ह व्हिडिओ तयार करता येतात. 

गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान

टिकटॉक अनइन्स्टॉल करण्याआधी अकाउंट डिलीट करा. त्यासाठी टिकटॉक लॉगइन केलेलं असेल तर अॅप ओपन केल्यानंतर त्यात Me पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर टॉपला ऑप्शनमध्ये मॅनेज माय अकाउंट असा पर्याय असेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा डिलिट माय अकाउंट सिलेक्ट करा. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमचे टिकटॉक अकाउंट डिलिट होते. तुम्ही अॅप अनइन्स्टॉल केलं असेल तर ब्राउजरमधूनही टिकटॉक ओपन करून लॉगइन करून पुन्हा अकाउंट डिलिट करू शकता. 



from News Story Feeds https://ift.tt/2CCVhBj

Comments

clue frame