नवी दिल्ली - भारतात टिकटॉक हे अॅप पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री सरकारने 59 चिनी अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये टिकटॉक, हॅलो सहित इतर अॅपचा समावेश आहे. दरम्यान टिकटॉकने याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिले. परंतु आज हे अॅप पूर्णपणे बंद झाला असून अॅप ओपन करताच नेटवर्क मध्ये त्रुटी दाखवणाऱ्या नोटिससह मेसेज पाठवला आहे.
टिकटॉकने युजर्सना पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं की, “प्रिय वापरकर्त्यांनो, आम्ही अॅप ब्लॉक करण्याच्या भारत सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याच्या प्रक्रियेत आहोत" असे यावर लिहलेलं दिसून येत आहे.
Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?
आता, टिकटॉक अॅपने डेस्कटॉप वेबसाइटसह सर्व उपकरणांवर कार्य करणे पूर्णपणे बंद केले आहे. तसेच या अॅपला गूगल प्ले स्टोरवरून देखील काढण्यात आले आहे. आता हे अॅप डाऊनलोडसुद्धा करता येणार नाही. रात्री याबाबत माहिती मिळताच टिकटॉकच्या वापरकर्त्यांना या अॅपवरती आपले शेवटचे व्हिडिओ तसेच लाईव्हच्या मार्फ़त सर्व फॉलोव्हर्सला इंस्टाग्राम, रोपोसो आणि यूट्यूबवर फॉलो करण्याचे आवाहन केले.
दरम्यान या ऍपसाठी भारताने विविध पर्यायी अॅप पण तयार केले असून सध्या सगळे या अॅपकडे धाव घेत आहेत. मनोरंजनाचा मोठा स्रोत म्हणून टिकटॉकची भारतात चांगली प्रसिद्धी व वापर होता. मात्र आता पुन्हा इतक्या मोठ्या संख्येने फॉलोव्हर्स तयार करणे जणू या कलाकारांसाठी आव्हानच आहे.
चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती
भारत चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याआधी भारतात नागरिकांनी चीनी वस्तू आणि अॅपवर बहिष्कार घालण्याची मोहिमही उघडली होती. भारत सरकारने बंदी घातलेल्या अॅपमध्ये टिकटॉक, शेअर इट, युसी ब्राउझर, कॅम स्कॅनर यांसारख्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या अॅपचा समावेश आहे.
from News Story Feeds https://ift.tt/38dFW60
Comments
Post a Comment